Thursday, July 4, 2024

Latest Posts

Sahitya Akademi Yuva Puraskar 2024: पुरस्काराचे मानकरी ठरले; राजकीय विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव

अभिमानास्पद..! साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेतील 'युवा' साहित्यासाठी देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ कादंबरीला मिळाला आहे.

नवी दिल्ली साहित्य अकादमी चे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषेसाठी देविदास सौदागर (Devidas Saudagar) यांच्या ‘उसवण’ कादंबरीला युवा साहित्य अकादमी तर बाल साहित्यासाठी साहित्यकार व कथाकार भारत सासणे (Bharat Sasne) यांच्या ‘समशेर आणि भूत बंगला’ कादंबरीस बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आनंद व्यक्त केला आहे. तुळजापूर येथील लेखक देवीदास सौदागर यांना ‘उसवण’ या कादंबरीसाठी युवा साहित्य पुरस्कार तर ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना ‘समशेर आणि भूत बंगला’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार जाहिर झाला. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. या पुरस्काराबद्दल दोघांचेही हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असे ट्विट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले आहे. 

यासोबतच, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरस्कारप्राप्त लेखकांचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार तर देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला. याबद्दल या दोन्ही साहित्यकांचं मनःपूर्वक अभिनंदन! घरची परिस्थिती बेताची असल्याने देविदास सौदागर यांनी चरितार्थासाठी टेलर काम करत शिक्षण घेतलं आणि आजही त्यांचं हे काम सुरू आहे. मात्र बदलत्या काळानुसार रेडीमेड कपड्यांची खरेदी वाढल्याने शिवणकाम कमी झालं. याच विषयावर त्यांची उसवण ही कादंबरी आहे. या दोन्ही साहित्यिकांच्या हातून भविष्यातही मोठी साहित्यसेवा घडो, ही सदिच्छा आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा! अशा शब्दांत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. 

अभिमानास्पद..! साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेतील ‘युवा’ साहित्यासाठी देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ कादंबरीला मिळाला आहे. तसेच, ‘बाल’ साहित्यासाठी भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ कादंबरीला हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची बाब अत्यंत आनंददायी आहे. आपल्या प्रभावी लेखणीतून मानवी स्वभाव यांचे रंजक चित्रण करणाऱ्या, ‘ युवा’ व ‘बाल’ वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणाऱ्या दोन्ही प्रतिभावंत साहित्यिकांचे या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन! असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss