‘सँड शार्क’ भारतीय नौदलात सामील, आयएनएस वगीरवरून समुद्रात भारताची ताकद वाढली

‘सँड शार्क’ भारतीय नौदलात सामील, आयएनएस वगीरवरून समुद्रात भारताची ताकद वाढली

INS वगीरचा भारतीय नौदलात (Indian Navy) समावेश करण्यात आला आहे. प्रोजेक्ट ७५ अंतर्गत कलवरी वर्गाची ही पाचवी पाणबुडी आहे, जी भारतीय नौदलात सामील झाली आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत आयएनएस वगीर नौदलात दाखल झाले. नौदलाने म्हटले आहे की, आयएनएस वगीर जगातील सर्वोत्तम सेन्सर आणि टॉर्पेडो आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. या पाणबुडीमध्ये (submarine) विशेष ऑपरेशन्ससाठी मरीन कमांडोज लाँच करण्याची क्षमताही आहे. हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयएनएस वगीरचा भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे.

INS वगीर पूर्णपणे भारतात बांधली गेली आहे. हे फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने मुंबईच्या Mazagon डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधले आहे. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे या पाणबुडीचा वापर पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, समुद्रात भूसुरुंग टाकणे आणि टेहळणीच्या कामात करता येणार आहे. ही पाणबुडी किनारपट्टीवर आणि समुद्राच्या मध्यभागी दोन्ही ठिकाणी तैनात केली जाऊ शकते. या पाणबुडीच्या चाचण्या झाल्या आहेत.

INS वगीर ही डिझेल इलेक्ट्रिक क्लासची (Diesel Electric Class) पाणबुडी समुद्रात ताशी ३७ किलोमीटर वेगाने धावू शकते. ही पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावर एकावेळी १२ हजार किलोमीटर अंतर पार करू शकते, त्यानंतर ती समुद्राच्या आत एकावेळी एक हजार किलोमीटर अंतर पार करू शकते. INS वगीर समुद्रात जास्तीत जास्त ३५० मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते आणि ५० दिवस सतत समुद्राखाली राहू शकते.

आयएनएस वगीरची खास गोष्ट म्हणजे ती आपले मिशन अतिशय शांतपणे पार पाडते, म्हणूनच याला सायलेंट किलर म्हटले जात आहे. हे पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे रडार देखील ते सहजपणे पकडू शकत नाहीत. या पाणबुडीमध्ये ५३३ मिमीच्या ८ टॉर्पेडो ट्यूब आहेत, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे लोड करता येतात. ही पाणबुडी समुद्रात भूसुरुंग टाकण्याचेही काम करू शकते, त्यामुळे शत्रूचे खूप नुकसान होऊ शकते. त्याचे गुण पाहून त्याला सँड शार्क असे नाव देण्यात आले आहे. हिंद महासागरात चीनच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची ठरू शकते.

हे ही वाचा:

प्लॅनेट मराठीच्या ‘कंपास’चा मुहूर्त संपन्न, मल्टिस्टारर वेबसीरीजच्या चित्रीकरणाला सुरुवात

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version