spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sarvepalli Radhakrishnan Birthday : ‘या’ कारणामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो शिक्षक दिन…

Sarvepalli Radhakrishnan Birthday: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे माजी राष्ट्रपती, तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रासमध्ये झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan)यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीस सहाय्यक प्राध्यापक आणि नंतर प्राध्यापक म्हणून मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज (Presidency College )आणि म्हैसूर विद्यापीठामध्ये (University Of Mysuru) काम केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विषयात पदवी घेतली असून ‘द फिलॉसॉफी ऑफ रवींद्रनाथ टागोर’ या नावाचे पुस्तक लिहिले. भारताचे माजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

५ सप्टेंबर रोजी दरवर्षी सगळीकडे शिक्षण दिन साजरा करतात. शिक्षक दिन साजरा करणे म्हणजे शिक्षकांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तसेच शिक्षकांचे आभार मान्यण्याचा दिवस. यादिवशी गुरूंना वंदन करून फुले किंवा पुष्पगुच्छ देऊन आदर भाव व्यक्त केला जातो. शिक्षकच आपलया आईवडिलांनंतरचे वंदनीय स्थान असते. शिक्षकांमुळेच आपले आपलयाला आयुष्यात ज्ञान मिळते. माणूस शेवटपर्यंत एक विद्यार्थीच असतो. आपल्या आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहचण्याचा मार्ग गुरूच दाखवतात. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला शिक्षक मार्गदर्शन करू शकतात.

भारताचे माजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन साजरा करतात कारण, ‘हे विश्वच माझी शाळा’ असे राधाकृष्णन म्हणत असे. एकदा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे काही शिष्य त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला जास्त अभिमान वाटेल, असे त्यांनी म्हंटले. तेव्हापासून दरवर्षी ५ सप्टेंबरपासून शिक्षक दिन साजरा होऊ लागला. पहिल्यांदा ५ सप्टेंबर १९६२ साली सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे राष्ट्रपती होते.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss