spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Savitribai Phule Jaynti 2023, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांची कारकीर्द

भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून दर वर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १९६२ रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

Savitribai Phule Birth Anniversary : भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून दर वर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १९६२ रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षका शिवाय चांगल्या करिअरची कल्पनाही करता येत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले आहे. सावित्रीबाई फुले यांची आज १९३ वी जयंती. महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंती लाच बालिका दिन असेही म्हटले जाते. आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी धडपडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे ३ जानेवारी १८३१ रोजी त्यांचा जन्म झाला. सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडेवाड्यात पुण्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.

भारतीय सामाजिक सुधारणेचे अग्रणी असलेल्या महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून सावित्रीबाईंनी समाज सुधारणेचं काम केलं. त्या काळात मुलीचं शिक्षण म्हणजे अशक्य अशीच गोष्ट होती. पण ज्योतिबांच्या मदतीने सावित्रीबाईंनी त्याची सुरुवात केली. सामाजिक सुधारणा असो वा अन्यायी रुढी परंपरा असो, सावित्रीबाई आपल्या मतांवर कायम ठाम राहिल्या आणि भारतीय मुलींच्या शिक्षणाची द्वारे खुली केली.

ज्योतिबा फुले १३ वर्षाचे असताना आणि सावित्रीबाई १० वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले. नंतर त्यांनी बालविवाहाची प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणासाठी काम करताना त्यांना त्यांच्या घरातून बाहेर पडावं लागलं आणि समाजातून बहिष्कृत व्हावं लागलं. १९४८ साली त्यांनी पुण्यात मुलींच्यासाठी पहिली शाळा स्थापन केली. त्यावेळी त्यांच्या या शाळेत केवळ ९ मुली होत्या.

असे म्हणतात की, सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत. सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले. त्यावेळी मुलीचा बालविवाह होत व ती विधवा झाली तर तिचे केस मुंडण करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते . त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवांसाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले.

हे ही वाचा:

तुम्हाला माहित आहे का ? पोट कमी करण्यासाठी पनीर किती फायदेशीर आहे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss