spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांच्या खिशाला कात्री ; मध्यरात्रीपासून CNG आणि PNG चे केले नवे दर लागू

सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच, सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये आजपासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू करण्यात आले आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ झाली आहे.

नव्या दरानुसार, मुंबईकरांना एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी  मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे. तसेच, पीएनजी दरवाढीमुळे गृहिणींचे महिन्याचे अंदाजपत्रकही कोलमडू शकते.

दरम्यान, सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ झाली असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच, सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मुंबईकरांना नव्या दरानुसार एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये तर घरगुती पीएनजीसाठी ४८ रुपये मोजावे लागतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजीचे दर कमी असले तरी  मुंबईतील बऱ्याच टॅक्सी व रिक्षा सीएनजीवर चालत असल्यामुळे प्रवास महागण्याची शक्यता आहे.रिक्षा टॅक्सी चालकांकडून प्रवासी भाडे देखील वाढले पाहिजे अशी मागणी आता करण्यात येत आहे.

महानगर गॅसने याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी दरवाढीचे कारण दिले आहे. त्यानुसार, सीएनजी आणि घरगुती पाईप नैसर्गिक गॅस, पीएनजीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी महानगर गॅसला कसरत करावी लागत आहे. बाजार मूल्याआधारीत खरेदी होत असल्याने त्यांना दरवाढ करावी लागली आहे. असे संगणयात आले आहे.

सीएनजी आणि पीएनजी किंमतीत वाढ झाली असली तरी दोन्ही इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे. महानगर गॅसची (Mahanagar Gas) सीएनजीची किंमत मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे जवळपास ५० टक्क्यांनी आणि १७ टक्क्यांनी स्वस्त आहे.

गद्दार लोकांच्या सेनेमुळे अशा घटनांना वाव, म्हणून Mumbai तुंबते, काय म्हणाले Ambadas Danve?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss