Smartphone Offer पहा फक्त पाच हजार रुपयात मिळतोय ‘हा’ फोन, पहा काय आहे ऑफर

Smartphone Offer पहा फक्त पाच हजार रुपयात मिळतोय ‘हा’ फोन, पहा काय आहे ऑफर

आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज काही खास ऑफर्सचा सुद्धा शेवटचा दिवस आहे. सध्या फ्लिपकार्टचा Year End Sale सेल सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे फ्लिपकार्टच्या या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेल मध्ये तुम्ही Realme C30 या स्मार्टफोनला बंपर डिस्काउंट सह खरेदी करू शकता. हा फोन तुम्हाला ५,२४९ रुपयांमध्ये मिळू शकतो. आता आम्ही तुम्हाला याबद्दल याबद्दल माहिती देणार आहोत.

Realme C30 या मोबाईलची मूळ किंमत ही ८,४९९ इतकी आहे. पण सध्या फ्लिपकार्ट वरील ऑफेरमध्ये हा फोन तुम्हाला तब्बल ५,२४९ रुपयांना मिळू शकतो. जे वापरकर्ते एअरटेल प्रीपेड वापरत आहेत. त्यांना फ्लिपकार्टच्या या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. आणि जर तुमच्या कडे अ‍ॅक्सिस बँक चे कार्ड असेल आणि तुम्ही जर तुमच्या अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एवढाच नाही तर यावर या व्यतिरिक्त ४,७०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा घेत तुम्हाला Realme C30 हा फोन अगदी कमी किमतीत मिळू शकतो.

Realme C30 या मोबाइलला ६.५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉचसह येतो. यात ८-कोर १२nm Unisoc T६१२ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. यात ३ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत UFS२.२ स्टोरेज मिळेल. फोनच्या स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोन अँड्राइड ११ वर आधारित रियलमी यूआय गो एडिशनवर काम करतो. यात पॉवर बॅकअपसाठी १० वॉट चार्जिंगसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ४G, ३G, २G, जीपीएस, ब्लूटूथ, वाय-फाय आणि ओटीजी सारखे फीचर्स मिळतील.रियलमीच्या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी व व्हीडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.

हे ही वाचा : 

अब्दुल सत्तारांचा पक्षामधल्या नेत्यांवर अविश्वास? केलं मोठं विधान

बॉयकॉटमुळे फ्लॉप ठरलेला Laal Singh Chaddha पुन्हा का होतोय सोशल मीडियावर ट्रेंड?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version