spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार अर्थसाहाय्य ; मुख्यमंत्र्यांनी आणली ‘वयोश्री योजना’

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवनव्या योजनांची मांदियाळी जनेतला खुणावत आहे. याच मांदियाळीतून जन्मलेली एक नवी योजना खास वरिष्ठ नागरिकांना आनंदून टाकणार आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना. ही योजना खास जेष्ठ नागरिकांच्या आर्थिकतेला आधारभूत ठरणार आहे. या योजनेचे उद्दिष्ट वरिष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देऊन आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी साधने पुरवून त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे आहे.राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

योजनेचा फायदा नक्की कसा आणि काय होणार ? 

  • ₹३,००० ची एकमुश्त आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या पैशाचा वापर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो, जसे की श्रवणयंत्रे, चष्मा, व्हीलचेअर्स, वॉकर इ.
  • या योजनेचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक स्वतःची काळजी घेण्यास आणि अधिक स्वावलंबी बनण्यास सक्षम होतील.

योजनेसाठीची पात्रता :

  • महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  1. आधारकार्ड /मतदान कार्ड 
  2. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
  3. पासपोट आकाराचे २ फोटो
  4. घोषणापत्रक 
  5. ओळख पटवण्यासाठी लागणारी शासनमान्य कागदपत्रे 

या योजनेत काय लाभ मिळणार ?

यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, कंबर बेल्ट, इ. सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करता येणार आहेत. तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एक रकमी तीन हजार पात्र लाभार्थ्यांना बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठीचे अधिकृत संकेतस्थळ :

https://sjsa.maharashtra.gov.in/en 

 

हे ही वाचा:

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आली नवी खुशखबर; गणेशोत्सव निमित्त सोडणार ‘या’ विशेष ट्रेन

MUMBAI HIGH COURT नं फेटाळला युक्तिवाद ; विनाअनुदानित शाळांचा RTE प्रवेशाबाबतचा अध्यादेश केला रद्द

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss