Imran Khan यांना सत्र न्यायालयच दणका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना इस्लामाबाद (Islamabad) येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने झटका दिला आहे

Imran Khan यांना सत्र न्यायालयच दणका

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister of Pakistan Imran Khan) यांना इस्लामाबाद (Islamabad) येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने झटका दिला आहे. तोशाखाना प्रकरणात त्याच्याविरुद्ध जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्याची पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख इम्रान यांची याचिका न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय दिवसासाठी राखून ठेवला होता. सुनावणी दरम्यान इम्रान खानचे वकील अली बुखारी, कैसर इमाम आणि गोहर अली खान यांनी युक्तिवाद केला.

 

पुढे बुखारी यांनी युक्तिवाद केला कि त्याचा आशिलाने कायमच कोर्टाच्या आदेशांचे पालन केले आहे. इमामने युक्तिवाद केला कि जर इम्रान खान हजार राहणार असतील टरपोलीस त्यांना अटक करू शकत नाही . यावर न्यायमूर्ती म्हणाले की पीटीआय प्रमुख वॉरंट निलंबित करण्यासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जाऊ शकतात . इमाम ने मात्र हे वॉरंट रद्द केले जाऊ नये अशी विनंती सत्र न्यायालयाकडे केली आहे. बुखारी म्हणाले की, पीटीआय प्रमुख लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क निवासस्थानी होते. त्यांना कोर्टात कसे हजर राहायचे हे जाणून घ्यायचे आहे.

इमाम युक्तिवाद करताना म्हणाले कि ,इमाम म्हणाले की पीटीआय प्रमुखाविरुद्ध निवडणूक कायदा २०१७ अंतर्गत खाजगी तक्रार दाखल करण्यात आली होती. सामान्यत: खाजगी तक्रारीवरून अटक वॉरंट जारी केले जात नाही. अशा स्थितीत वॉरंटला स्थगिती द्यावी. यावर, न्यायमूर्तींनी टिपणी केली की पीटीआय प्रमुखांच्या वकिलाने त्यांना कळवले आहे की त्यांचा अशिल न्यायालयात हजर राहणार नाही. यानंतर न्यायाधीशांनी याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.

हे ही वाचा :

अब्दुल सत्तरांच्या मतदार संघात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ज्यांनी मला वाढवला त्यांच्याशी पाईक राहणं माझा कर्तव्य आहे – संजय जाधव

मोठी बातमी! Amitabh Bachchan यांचा अपघात, तातडीने मुंबईत रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version