Share Market : २०० अंकांनी सेन्सेक्स घसरला

शेअर बाजारात दोन दिवस दिसत असलेल्या तेजीला आज पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. नफावसुलीने शेअर बाजारात घसरण (Share Market) झाल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेली घसरण बाजार सुरू झाल्यानंतरही कायम राहिली. बँक निफ्टीतही (Bank Nifty) घसरण झाली आहे.

Share Market : २०० अंकांनी सेन्सेक्स घसरला

शेअर बाजारात दोन दिवस दिसत असलेल्या तेजीला आज पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. नफावसुलीने शेअर बाजारात घसरण (Share Market) झाल्याचे दिसून येत आहे. प्री-ओपनिंगमध्ये दिसून आलेली घसरण बाजार सुरू झाल्यानंतरही कायम राहिली. बँक निफ्टीतही (Bank Nifty) घसरण झाली आहे.

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स (Sensex) २१५.६० अंकांच्या घसरणीसह ५९,५०४ अंकांवर खुला झाला होता. त्याशिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) ४९.९० अंकांच्या घसरणीसह १७,७६६ अंकावर खुला झाला. सकाळी ९.५५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ११८ अंकांच्या घसरणीसह ५९,६०१.१७ अंकांवर व्यवहार करत होता. तर, ४८.४० अंकांच्या घसरणीसह १७,७६७.८५ अंकावर व्यवहार करत होता.

मंगळवारी, शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) ५७८ अंकांनी वधारत ५९,७१९ अंकांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) १९४ अंकांनी वधारत १७,८१६ अंकांवर बंद झाला. मंगळवारी शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात बँकिंग सेक्टर, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, मीडिया, ऑईल अँण्ड गॅस सेक्टर, ग्राहकोपयोगी वस्तू, एनर्जी, मेटल्स सेक्टरमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून आली. बाजारात आज स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला.

प्री-ओपनिंग सत्रात घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टीतील तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स १६७ अंकांच्या घसरणीनंतर ५९,५५२ व्यवहार करत होता. तर, निफ्टीत ६५ अंकांची घसरण दिसून आली. एसजीएक्स निफ्टीदेखील घसरणीसह १७,७७२ अंकांवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. नेस्ले, एचयूएल, मारुती, टाटा स्टील, डॉ. रेड्डीज लॅब, महिंद्रा अँण्ड महिंद्राच्या शेअर दरात वाढ झाली आहे. तर, अँक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, एचसीएल टेक, विप्रो, एनटीपीसीच्या शेअर दरात घसरण झाली आहे. टीसीएस, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेच्या शेअर दरात घसरण झाली आहे.

हे ही वाचा:

हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध

प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version