spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Share Market : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स ६१, १२१ हजारांवर

शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रातही तेजी कायम असल्याचं दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) ३७४ अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) १३३ अंकांची वाढ झाली.

शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रातही तेजी कायम असल्याचं दिसून आलं आहे. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) ३७४ अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) १३३ अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज ०.६२ टकक्यांची वाढ होऊन तो ६१,१२१ अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये ०.७४ अंकांची वाढ होऊन तो १८,१४५ अंकांवर स्थिरावला.

आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३१८.९९ अंकांनी वधारत ६१,०६५. ५८ अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ११८. ५० अंकांनी वधारत १८,१३०. ७० अंकांवर खुला झाला. सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक ३३८ अंकांनी वधारत ६१,०८४.६३ अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी १०८ अंकांनी वधारत १८,१२०.४५ अंकांवर व्यवहार करत होता.

शेअर बाजारातील सेन्सेक्सने सोमवारी ६० हजारांचा टप्पा पार केला होता. तर आज ६१ हजारांचाही टप्पाही पूर्ण केला. शेअर बाजारात आज १७६५ शेअर्समध्ये वाढ झाली, तर १५७९ शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण १२९ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Divis Labs, NTPC, Power Grid Corp आणि Grasim Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Axis Bank, UPL, Eicher Motors, Reliance Industries आणि Maruti Suzuki या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.

आज उर्जा, मेटल, फार्मा, आयटी या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली तर रिअँलिटी इंडेक्समध्ये एका टक्क्याची घसरण झाली. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये एक टक्का तर आणि स्मॉलकॅपमध्ये ०.२६ टक्क्यांची वाढ झाली.

हे ही वाचा:

गुलाबभाऊ मला तीन महिन्यांचे बाळ म्हणत असतील तर बाळ जसा सर्व खोड्या करतो, त्या करण्याचा मला सर्व अधिकार आहे; सुषमा अंधारे

Kishori Pednekar : ‘कर नाही त्याला डर कशाला’, अडीच तासाच्या पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss