spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Share Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, अदानी समूहाचे शेअर्स देखील सुसाट

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) चांगलीच सुरुवात झाली आहे

आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात (Share Market) चांगलीच सुरुवात झाली आहे. आज सेन्सेक्ससह निफ्टीची घोडदौड सकारात्मक सुरु आहे. (Share Market Opening) सेन्सेक्स 400 अंकांना वाढला असून निफ्टीही वाढून 17400 अंकांच्या पुढे गेलाय. सेन्सेक्स सध्या 495.23 अंकांनी वाढून 59,404.58 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने 156.25 अंकांनी उसळी घेतली असून 17448.23 वर ट्रेड करत आहे.

आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे 500 अंकांच्या वाढीसह तर, निफ्टी 150 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. या दरम्यान अदानी समुहाच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी हिंडनबर्ग रिपोर्ट सादर झाल्यानंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचे शेयर्सची घसरण पाहायला मिळाली. परंतु आज शेअर बाजारात सेन्सेक्सची उसळी मारल्याचा फायदा अडाणी समूहाला देखील झाला आहे.
एसबीआयचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहेत.

 


BSE सेन्सेक्स आणि NSE निफ्टी दोन्ही प्रो-ओपनिंगपासून मजबूत स्थितीत होते. सिंगापूरमध्ये, NSE निफ्टी SGX निफ्टी (SGX निफ्टी) चे फ्युचर्स 1.50 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत होते. यावरुनच आज देशांतर्गत शेअर बाजारात चांगला व्यवसाय होण्याची अंदाज वर्तवण्यात आला होता. शेअर बाजारात व्यवहार सुरु झाला तेव्हा बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 450 हून अधिक अंकांच्या वाढीसह 59,400 अंकांच्या जवळ पोहोचला. त्याचप्रमाणे NSE निफ्टीने सुमारे 115 अंकांच्या वाढीसह 17,475 चा टप्पा ओलांडला.

आज सुरुवातीच्या सत्रात एशियन पेंट्स (Asian Paints) आणि अल्ट्राटेक सिमेंट (Ultratech Cement) व्यतिरिक्त 28 शेअर्स तेजीत होते. एसबीआयचे (SBI) शेअर्स सर्वाधिक 3.31 टक्के तेजीत व्यवहार करत होते. पॉवर ग्रिड (Powergrid Corporation) आणि इंडसइंड बँक (Indusind Bank) शेअर्समध्येही प्रत्येकी दोन टक्क्यांनी उसळी पाहायला मिळाली. एनटीपीसी (NTPC), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries), भारती एअरटेल (Bharti Airtel), आयटीसी (ITC), एचसीएल टेक (HCL Tech), एल अँड टी (L&T), टाटा स्टील (Tata Steel), महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) शेअर्समध्येही प्रत्येकी एक टक्क्यांची वाढ झाली आहे.

हे ही वाचा :

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या तापामुळे रुग्णालयामध्ये दाखल

अंगणवाडी सेविकांच्या पदरामध्ये अजून निराशाच, बाळासाहेब थोरात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss