चिप प्रकल्पामुळे खरेदी वाढली, एकाच दिवसात वेदांता कंपनीचे शेअर्स १३% वाढले

१३ टक्क्यांनी झेप घेतली आणि ती ३१४.८० रुपयांपर्यंत पोहोचली.

चिप प्रकल्पामुळे खरेदी वाढली, एकाच दिवसात वेदांता कंपनीचे शेअर्स १३% वाढले

बहुराष्ट्रीय कंपनी वेदांता गुजरातमध्ये सेमी कंडक्टर आणि काच डिस्प्ले प्लांट उभारणार आहे. या घोषणेनंतर आज त्यांचे शेअर्स मध्ये मोठी खरेदी झाली आहे 14 सप्टेंबर रोजी जोरदार खरेदीच्या बळावर त्यांच्या शेअर्सने इंट्रा – डेमध्ये १३ टक्क्यांनी झेप घेतली आणि ती ३१४.८० रुपयांपर्यंत पोहोचली. तथापी, यानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे किंमतीत थोडीशी घसरण झाली आणि बीएसईवर १०.०१ टक्क्यांच्या वाढीसह तो ३०५.४५ रुपयांवर बंद झाला.

नवीन प्लांटच्या घोषणेमुळे वेदांताच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीचा कल दिसून येत आहे. तथापि, जर २०२२ या संपूर्ण वर्षाबद्दल बोलायचं झालं तर शेअर्स जवळपास १४ टक्क्यांनी कमकुवत झाले आहेत. या वर्षी वेदांतचा शेअर ११ एप्रिल रोजी, ४४०.७५ रुपयांच्या घरात अवघ्या ५२ आठवड्यात पोहोचला होता. मात्र, त्याची गती टिकून न राहिल्यामुळे १ जुलै रोजी २०६.१० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. यानंतर वेदांतामध्ये खरेदी वाढली आणि आतापर्यंत ४८ टक्के रिकव्हरी झाली आहे.

तैवानी कंपनी फॉक्स कोणत्या सहकार्याने वेदांत गुजरात मध्ये १.५४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने चिप आणि डिस्प्ले एफएबी प्लांट उभारत आहे ही वेदांताची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. सेमीकंडक्टर मार्केट झपाट्याने वाढत आहे आणि इथे चार वर्षात म्हणजे २०२६ पर्यंत ते $६३०० दशलक्ष पर्यंत पोहोचू शकते. २०२० मध्ये ते फक्त $१५०० दशलक्ष होते.

ऑटो आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये सेमीकंडक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो याशिवाय इलेक्ट्रिक वस्तूंमध्ये याचा वापर होतो सध्या जगातील बहुतांश देश चिपच्या पुरवठ्यासाठी तैवानसह इतर देशांवर अवलंबून आहेत. पण, लवकरच भारतही त्यात सामील होऊ शकतो.

हे ही वाचा:

‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज

लालबागच्या राजाच्या दरबारी ‘या’ तारखेला रंगणार सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version