तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तुनिशा शर्माने आत्महत्या केली. तुनिशा शर्माच्या हत्येनंतर या प्रकरणात अनेक ट्विस्ट आणि वळणे समोर आली आहेत. अलीकडेच शिझानच्या वकिलाने (Sheejan’s lawyer) शिझानची मानसिक स्थिती ठीक नसून पुढील प्रकरणांबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते.

अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी शिझानची (Sheezan Khan) चौकशी सुरुच आहे. आज शिझानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तुनिषा शर्मा आणि शिझानच्या कुटुंबियांचं खूपच चांगलं नातं होतं. तिच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी ती शिझानच्या कुटुंबियांसोबत शेअर करत होती. अशातच आता पत्रकार परिषदेत शिझानच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की,”अल्बम सॉंगसाठी (Album Song) तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली गेली”. शिझानची बहिण (Shizan’s sister) म्हणाली,”आत्महत्येआधी तुनिषा आणि माझं बोलणं झालं होतं. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुट्टी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुट्टी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला (Production House) विनंती करण्यास मला सांगितलं होतं”.

बहिण पुढे म्हणाली,”शिझानला नाताळची (christmas) दोन दिवसांची सुट्टी हवी होती. पण प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुट्टी मिळत नव्हती. दोन अल्बम सॉंगसाठी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिची सही घेण्यात आली. मी तिचं तिकीट बुक केलं असून तिच्या सुट्टीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते”. दुसरीकडे तुनिषाची आई आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाली होती,”आत्महत्येआधी तुनिषाचा मला फोन आला होता. त्यावेळी ती म्हणाली,”शूटिंगमुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही. तसेच मला दोन दिवसांची नाताळची सुट्टी आहे. ही दोन दिवसांची सुट्टी चंदीगडला घालवण्याची माझी इच्छा आहे”. चंदीगडला जाण्यासाठी मी तिला होकार देखील दिला होता.

हे ही वाचा : 

वाहन विक्रीच्या बाबतीत ‘या’ कंपनीने हुंडाईला मात देत पटकावला दुसरा क्रमांक

दिल्ली कार अपघातावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार यांच्या विरोधात भाजपा आक्रमक, प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version