प. बंगालमधील धक्कादायक घटना, Rahul Gandhi यांच्या गाडीवर दगडफेक

पश्चिम बंगालमधून आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट ही समोर आली आहे.

प. बंगालमधील धक्कादायक घटना, Rahul Gandhi यांच्या गाडीवर दगडफेक

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : पश्चिम बंगालमधून आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट ही समोर आली आहे. मालदा येथे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Jodo Nyay Yatra) राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवार दुपारी मालदा येथे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहचली, त्यावेळी दगडफेक झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. गाडीवर दगडफेक झाल्यानंतर राहुल गांधी खाली उतरले. त्या गाडीमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजनही उपस्थित होते.

या घटनेत कारच्या मागील खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने राहुलला दुखापत झाली नाही. या घटनेच्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी नियुक्त स्टॉपवर पोहोचल्यानंतर वाहनातून खाली उतरताना आणि खराब झालेल्या वाहनाच्या खिडकीच्या काचा तपासताना दिसत आहेत. बिहारमधून यात्रा पश्चिम बंगालमध्ये परत येत असताना मालदाच्या हरिश्चंद्रपूर भागात हा हल्ला झाला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’ सध्या बिहारमध्ये आहे. बुधवारी कटिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा केली. राहुल गांधी यांनी लोकांना अभिवादन केलं. या यात्रेदरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यामध्ये राहुल गांधी यांच्या कारच नुकसान झालं. ते थोडक्यात बचावले असल्याचे चित्र दिसून येत आहे. राहुल गांधी कारमधून उतरुन बसमध्ये बसले. त्यानंतर प्रशासनाने लोकांना शांत केलं. आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा १८ वा दिवस आहे. राहुल गांधी यांची यात्रा आज बिहारमधून बंगालमध्ये प्रवेश करेल.

राहुल गांधी यांच्या ज्या गाडीवर हल्ला झाला, त्या गाडीमध्ये खासदार अधीर रंजनही होते. गाडीची काच तोडण्यात आली. त्यावर अधीर रंजन म्हणाले की, “जितका विरोध व्हायचा तितका झालाय, याची सुरवात कूचबिहारपासून झाली. राज्यात विविध जिल्ह्यात सरकारी कामासाठी प्रशासकीय अधिकारी गेस्ट हाऊसमध्ये राहिले आहेत. त्यामुळे तृणमूल सरकारने राहुल गांधींच्या न्याय यात्रेला गेस्ट हाऊस अथवा स्टेडियम उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलेय. “

हे ही वाचा:

अशोक सराफ यांचा जीवनप्रवास,आणि मजेशीर किस्से

Manipur violence : मणिपूर मध्ये हिंसाचाराचे सत्र सुरूच, गोळीबारात २ मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version