spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्या प्रकाणामध्ये मोठा खुलासा; २ वर्षापूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का? असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलं आहे. यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं २०२० मध्येच केली होती, अशी माहिती येत आहे. यात आफताब गळा दाबून मारण्याची आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे. तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती, असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलं आहे. मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे.. श्रद्धानं काही काळानंतर ही तक्रार मागे घेतल्याचीही माहिती आहे.

श्रद्धा हत्याकांडात श्रद्धाचा दोन वर्षापूर्वीच एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे. २०२० मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटले आहे. हे पत्र २८ नोव्हेंबर २०२० रोजीचे आहे. श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताब चुकीची माहिती देत ​तपास वळवत असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. मागील आठवड्यात न्यायालयाने नार्को चाचणीलाही परवानगी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडे श्रद्धा आणि आफताब यादोघांमध्ये भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. याच वादातून आफताबने १८ मे २०२२ ला श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा : 

Aaditya Thackeray : राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याने आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील ‘राजकीय लढा’ चर्चेत; सहानुभूतीसाठी निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप

IND vs NZ : टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss