spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shraddha Walkar श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेत व्यथा मांडली, आफताबला कठोर शिक्षा देण्याची केली मागणी

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर (Shraddha Walker’s father is Vikas Walker) यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची श्रद्धा हत्याकांड संदर्भात त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. आपल्याला न्याय मिळेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी (Shraddha Walkar Father Press Conference) बोलताना सांगितले. श्रद्धा वालकरचे वडील फडणवीस यांना भेटायला गेले असता त्याठिकाणी भाजपचे किरीट सोमय्याही देखील उपस्थित होते. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला, ज्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि नंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले, साकेत न्यायालयाने शुक्रवारी त्याच्या कोठडीत वाढ केल्याने आणखी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहणार आहे. आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी श्रद्धा वालकर हिच्या वडिलांनी केली आहे.

हेही वाचा : 

४८ तास थांबून, शरद पवार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात जाणार होते त्याचं काय झालं?, निलेश राणेंचा खोचक सवाल

पत्रकार परिषदेत विकास वालकर म्हणाले, श्रद्धा वालकरची हत्या झाली असून आम्हाला अत्यंत दु:ख आहे. यावेळी दिल्ली गव्हर्नर यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मला दिले आहे. आतापर्यंत झालेल्या तपासाबद्दल दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि वसई पोलीस (Vasai Police) यांचे काम संयुक्तपणे व्यवस्थित चालले. मात्र अगदी सुरूवातीस वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, जर तसे झाले नसते तर, आज माझी मुलगी जिवंत असली असती, किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती असे विकास वालकर म्हणाले आहेत.

विकास वालकर (Vikas Walker) पुढे म्हणाले की, “माझ्या मुलीने घर सोडण्यापूर्वी मला सांगितले होते की मी सज्ञान झाली आहे आणि त्यामुळे कदाचित मी काही करू शकलो नाही.” श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, १८ वर्षांनंतर मुलांना धर्मांची योग्य माहिती दिली पाहिजे आणि मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे.

REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G ची भारतात एन्ट्री

विकास वालकर यांनी सांगितले की, २०२१ मध्ये श्रद्धासोबत त्यांचे शेवटचे बोलणे झाले होते आणि श्रद्धाने सांगितले होते की ती बेंगळुरूमध्ये आहे आणि ती पूर्णपणे बरी आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी श्रद्धाला एवढेच सांगितले की, आफताब आपल्या समाजाचा नाही आणि त्यामुळेच तो विरोध करत आहे. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा हे आपल्याला माहीत नसल्याचंही विकास वालकर म्हणाले. न्यायालयात आम्हाला सरकारकडून वकील दिला जाणार आहे. त्यासोबत या केसमध्ये दिल्लीच्या वकील सीमा कुशवाह या देखील आमची बाजू न्यायालयात मांडतील.

शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप कारवाई करणार?, पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर उदयनराजे भोसले म्हणाले

Latest Posts

Don't Miss