…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘ ठिकाणाची निवड

कुनो नॅशनल पार्क हे ७४८चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे.

…म्हणून चित्त्यांसाठी करण्यात आली मध्यप्रदेशातील ‘ कुनो ‘  ठिकाणाची निवड

भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनी पुन्हा भारतात दिसणार आहेत. नामबियासोबत झालेल्या करारामुळे नामिबियामधून आज आठ चित्ते भारतात दाखल झाले. या चित्त्यांना विशेष आफ्रिकन विमानांनी चित्त्यांना भारतात आणलं आहे. हे आठ चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवण्यात येणार आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.

चित्त्यांसाठी ‘कुनो’ चीच निवड का करण्यात आली?

२०१० ते २०१२ दरम्यान भारतात एक सर्वेक्षण केले होते. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील १० ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणानंतर वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया (WTI) ने हवामान बदल, शिकार, प्रतिस्पर्धी भक्षकांची संख्या आणि ऐतिहासिक श्रेणी यावर आधारित केलेल्या मूल्यांकनावर कुनो अभयारण्याची चित्त्यांच्या अधिवासाठी निवड करण्यात आली. कुनो हे बहुधा देशातील काही वन्यजीव स्थळांपैकी एक आहे.

लोकसंख्येची घनता आणि कमी होणारी खुली गवताळ मैदाने यामुळे भारतातील प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. पण, काही वर्षापूर्वी उद्यानाच्या आतून सुमारे २४ गावे आणि त्यांच्या पाळीव जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गावातील ठिकाणे आणि त्यांची कृषी क्षेत्रे आता प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. त्याचबरोबर या जंगलात बिबट्यांची लक्षणीय संख्या आहे. पुरेशी शिकार आणि इतर घटक उपलब्ध असल्यामुळे चित्त्यांसाठी कुनो अभयारण्य एक उत्तम पर्याय ठरले आहे.

काय आहे ‘ प्रोजेक्ट चित्ता ‘?

वाढती मानवी लोकसंख्या, कमी होत जाणारे शिकारी तळ आणि राजघराण्यातील अनिर्बंध शिकार यामुळे चित्ता हळूहळू नष्ट होत गेला.

पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी — जो काही सेकंदात ताशी १२० किमीचा वेग पकडू शकतो — पण,तो गोळ्यांच्या वेगाला मागे टाकू शकला नाही. आणि १९४७ मध्ये, कोरावीच्या महाराजांनी केलेल्या गोळ्यांनी शेवटच्या तीन चित्त्यांचं मृत्यू झाला असे मानले जाते. १९५२ मध्ये, चित्ता अखेर भारतातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.

भारताला नेहमीच चित्ता आपल्या जंगलात परत हवा होता. इराणने भारताची विनंती धुडकावून लावल्याने एशियाटिक चित्ता पुन्हा आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. आत्तापर्यंत इराणकडे फक्त २० आशियाई चित्ते शिल्लक आहेत. त्यानंतर भारतीय सरकार आफ्रिकेकडे वळले. ज्यांच्याकडे सध्या जवळपास ७,००० चित्ते शिल्लक आहेत, बहुतेक चित्ते हे नामिबिया, बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आढळून येतात. १२ वर्षांहून अधिक वाटाघाटीनंतर, नामिबिया आणि भारताच्या सरकारांनी अखेर या वर्षी एक करार केला. नामिबियाने पुढील पाच वर्षांत ५० चित्ते भारतात पाठवण्याचे मान्य केले आहे.

हे ही वाचा:

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

नक्की काय आहे भारताचं ‘प्रोजेक्ट चित्ता’?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version