spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Solar Eclipse 2022 : खगोल प्रेमीसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यात दिसणार सूर्यग्रहण

आज दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे २५ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्ण देशभरात आज सूर्यग्रहण होणार आहे. या वर्षाचे म्हणजे २०२२ सालाचे शेवटचे सूर्यग्रहण (solar eclipse). हे ग्रहण काही राज्यात पाहता येणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. एका गणनेनुसार, गेल्या १३०० वर्षांनंतर, बुध, गुरू, या दोन प्रमुख सणांमध्ये पडणारे सूर्यग्रहण. सूर्यग्रहण भारतात दिसले तर त्याचा सुतक कालावधी वैध असेल. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण बघताना दुर्बीणचा वापर करावा.

तसेच हे सूर्य ग्रहण आज २५ ऑक्टोबर २०२२ रोजी ४:२९ ते ५:४२ पर्यंत पाहता येणार आहे. तसेच सूर्यग्रहण वेळेचा कालावधी १ तास १९ मिनिटे आहे. देशाच्या खगोलशास्त्रज्ञांच्या मते सूर्यग्रहण देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात सहज दिसेल, तसेच पूर्वेकडील भागात हे ग्रहण दिसणार नाही कारण येथे सूर्यास्त लवकर होणार आहे. भारतात ४ नंतर सूर्यग्रहण चालू होणार आहे.

तसेच हे सूर्यग्रहण दिल्ली मध्ये ४:२९ ते ५:४२ या कालावधी मध्ये दिसणार आहे. चेन्नई मध्ये ५:१४ ते ५:४४ पर्यंत दिसणार आहे. कोलकत्ता मध्ये दुपारी ४:५२ ते ०३ वाजे पर्यंत आहे. पाटणा मध्ये ४:४२ ते ५:२३ पर्यंत दिसणार आहे. डेहराडून मध्ये ४:२६ ते ५:३६ या कालावधी मध्ये दिसणार आहे. शिमला ४:२३ ते ५:३९ पर्यंत दिसणार आहे. नागपूर मध्ये सूर्यग्रहणाला दुपारी ४: ४९ दिसणार आहे. रायपूर मध्ये दुपारी ४:५१ ते पहाटे ५:३० पर्यंत दिसणार आहे. मुंबई मध्ये ४:४९ ते ०९ वाजेपर्यंत आहे. भोपाळ ४:४९ ते ५:४६ पर्यंत आहे. तसेच पाटणा मध्ये ४:४२ ते ५:२३ पर्यंत दिसणार आहे. भारत सह हे सूर्यग्रहण युरोप, ईशान्य आफ्रिका, नैऋत्य आशिया आणि अटलांटिकमध्ये दिसणार आहे. तसेच आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड देशाच्या या भागांमधील देखील लोकांना सूर्यग्रहण दिसणार नाही.

Latest Posts

Don't Miss