Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणामुळे मंदिर बंद राहणार

Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणामुळे मंदिर बंद राहणार

भारतामध्ये तसेच इतर राज्यात देखील सूर्यग्रहण शेवटचे आहे. तसेच हे भारतामध्ये पहिले सूर्यग्रहण आहे जे दिसणार आहे. हे ग्रहण म्हणजे दुर्मिळ खगोलीय घटना आहे. सूर्यग्रहण भारतात दिसले तर त्याचा सुतक कालावधी वैध असेल. हे ग्रहण उघडया डोळयांनी पाहू नये. तसेच या सूर्यग्रहणामुळे राज्यातील अनेक मंदिरे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना दर्शन घेता येणार नाही. आज संध्याकाळी 4.48 मिनिटांनी सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण 5.50 मिनिटांनी संपणार आहे.

तसेच सूर्य ग्रहणामध्ये बऱ्याच गोष्टी पाळाव्या लागतात. ग्रहण सुरु झाल्यापासून ते ग्रहण संपेपर्यंत खाऊपिऊ नये, मंदिरात, घराबाहेर जाऊ नये, ध्यान, जप करावा, गर्भवती स्त्रियांसाठीही बरेच नियम असतात. तसेच या काळात बरेच मंदिरे भाविकांसाठी बंद असतात.

सिद्धिविनायक मंदिरात संध्याकाळी ४:३० ते ६:३० च्या दरम्यान लोकांना दर्शनासाठी प्रवेश नाही. तसेच यावेळी सिद्धिविनायक मंदिरात जल अभिषेक करता येणार नाही. तसेच संध्याकाळी ७ च्या नंतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

आई एकविराचे दर्शनासाठी भरपूर प्रमाणात गर्दी मंदिरात पाहायला मिळते. यंदा अमावास्येच्या दिवशीच खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने दर्शनासाठी एकवीरादेवी मंदिर बंद ठेवण्यात आले. तसेच हे मंदिर पूर्ण दिवस बंद राहणार आहे. एकवीराचे मंदिर २६ ऑक्टोबर म्हणजे पाडव्याचा दिवशी चालू होणार आहे. तसेच सायंकाळी साडेसहा वाजता दीपाेत्सव साजरा केला जाणार आहे.

तसेच सूर्यग्रहणामुळे काशी विश्वनाथ मंदिर देखील बंद असणार. काशी विश्वनाथ हे मंदिर उद्या म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी या मंदिराचे भाविकांसाठी दरवाजे उघडणार आहे.

खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने स्वामी मंदिर बंद राहणार आहे. तसेच हे मंदिर २५ ऑक्टोबरला रोजीच रात्री ८ नंतर भाविकांसाठी स्वामी मंदिर नेहमीप्रमाणे चालू होणार आहे.

खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे आज शिर्डी येतील साईचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. दुपारी चार वाजून ४० मिनिटे ते सायंकाळी सहा वाजून ३१ मिनिटांपर्यंत भाविकांना साई समाधीचे जवळून दर्शन बंद राहाणार आहे.

Exit mobile version