दिवाळीनिमित्त आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैनिकांची मिठाईची देवाणघेवाण

दिवाळीनिमित्त आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैनिकांची मिठाईची देवाणघेवाण

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तान रेंजर्सनी (Pakistan Rangers) सोमवारी जम्मू (Jammu) भागातील १९८ किमी लांबीच्या भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर दिवाळीनिमित्त मिठाई (sweets) आणि आनंदाची देवाणघेवाण (exchanged) केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “दिवाळीच्या निमित्ताने, बीएसएफ आणि पाक रेंजर्सनी जम्मू सीमेवरील विविध सीमा चौक्यांवर (बीओपी) अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात मिठाईची देवाणघेवाण करण्यात आली,” असं बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले.

बीएसएफ (BSF) जम्मूने पाकिस्तान रेंजर्सना मिठाई देण्यात अली त्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा मिठाई देण्यात आली, असेही ते म्हणाले. मिठाईची देवाणघेवाण सांबा, कठुआ, आरएस पुरा आणि अखनूर सीमेवरील सर्व BoPs वर केली गेली. बीएसएफ प्रभावीपणे वर्चस्व राखून सीमेवर शांततापूर्ण आणि अनुकूल वातावरण निर्माण करण्यात नेहमीच आघाडीवर असते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, “अशा प्रकारचे हावभाव दोन्ही सैन्यांमधील सीमेवर शांततापूर्ण वातावरण संबंध निर्माण करण्यास ही देवाणघेवाण मदत करते.” २ ऑगस्ट रोजी बीएसएफने सांबा येथे तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला होता तेव्हा सीमा रक्षकांनी सुमारे ८ किलो हेरॉईन जप्त केले होते.

तर व्हाईट नाइट कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यांच्यासमवेत जनरल अनिल चौहान (Anil Chauhan) यांनी राजौरी सेक्टरमधील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली आणि आघाडीवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले, “सीडीएसने नौशेरा सेक्टरमधील युद्ध स्मारक नमन स्थळावर पुष्पहार अर्पण केला आणि देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.” जनरल अनिल चौहान यांना फील्ड कमांडर्सनी नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सद्य ऑपरेशनल परिस्थिती आणि सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती दिली.

हे ही वाचा :

Alia Bhatt : आलियानं कशी साजरी केली लग्नानंतरची पहिली दिवाळी?

Nana Patole : दिवाळीनंतर राज्य सरकार बरखास्त करण्याच्या मागणीचा प्रस्ताव, राज्यपालांकडे जाणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version