Sunday, September 29, 2024

Latest Posts

मुकेश आणि नीता अंबानी कुणी दिली जीवे मारण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरु

मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि त्यांची मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.

बुधवारी एका अज्ञात क्रमांकावरून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात धमकीचा फोन आला होता. कॉलरने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि त्यांची मुले आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. या फोन कॉलसंबंधी तपास आता पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फोन करणाऱ्याचा लवकरच शोध लागण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईन क्रमांक १२५७ वर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला होता. ज्यामध्ये कॉलरने मुकेश अंबानी, नीता, आकाश आणि अनंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. फोन करणाऱ्याने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली आहे.

१५ ऑगस्टला रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये असाच कॉल करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्या व्यक्तीने हॉस्पिटलच्या डिस्प्ले नंबरवर आठ धमकीचे कॉल केले होते, ज्यामुळे मुकेश अंबानी यांच्या जीवाला धोका होता. त्यानंतर या घटनेसंबंधी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता, आणि धमकीच्या कॉलशी संबंध ठेवल्याप्रकरणी मुंबईच्या पश्चिम उपनगरात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते.

गेल्या वर्षी, मुकेश अंबानींच्या मुंबईतील घर ‘अँटिलिया’ बाहेर २० स्फोटक जिलेटिन स्टिक आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ सेडान सापडली होती. अँटिलियाच्या सुरक्षा पथकाने संशयास्पद स्कॉर्पिओबद्दल पोलिसांना सूचना दिल्यावर, बॉम्ब निकामी आणि कुत्र्यांच्या पथकांसह एक पोलिस पथक तपासासाठी त्वरीत घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसराला घेराव घालून वाहन हटवले.

हे ही वाचा:

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी महत्वाची बातमी, सुरक्षेच्या दृष्टीने स्क्रिनशॉट काढता येणार नाही त्या ऐवजी…

Dasara Melava : नाशिक महामार्गावर महिला शिवसैनिकांडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना दिला चोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss