spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Somvati Amavasya 2023, सोमवती अमावस्या म्हणजे काय, काय करावे या दिवशी

सोमवारी (monday) येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. हि अमावस्या महिन्यातून एकदा किंवा दोनदाच येते. हिंदू धर्मातील परंपरेत या अमावस्येला विशेष महत्त्व आहे.

सोमवारी (monday) येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. हि अमावस्या महिन्यातून एकदा किंवा दोनदाच येते. हिंदू धर्मातील परंपरेत या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. लग्न झालेल्या महिला या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. ही परंपरा कैक वर्षांपासून चालत अली आहे. या दिवशी मौनव्रत सुद्धा पाळले जाते त्यामुळे गाईंचा आशीर्वाद मिळतो.

यावर्षी फाल्गुन महिन्यातील हि सोमवती अमावस्या सोमवारी २० फेब्रुवारी २०२३ रोजी येत आहे (somvati amavasya 2023 ). दार वर्षी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवशी हि अमावस्या येते. या महिन्यातील अमावस्या ही खूप खास आहे.कारण यंदा २ वेळा हि अमावस्या येणार आहे. या फाल्गुन अमावस्येला दुर्मिळ योगायोग घडून आला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ केल्याने पितृदोष, कालसर्प दोष यापासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आशीर्वाद मिळतो यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.

पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या सोमवती अमावस्येचा सर्व दिवस श्राद्धविधीसाठी योग्य आहे. विशेषत म्हणजे सोमवती अमावस्येला पूजा आणि दान यांचं दुहेरी फळ मिळते. यंदाच्या या फाल्गुन अमावस्येला सोमवार आणि शिवयोगाचा योगायोग आहे. हा दिवस आणि येणारा योग दोन्ही महादेवाला समर्पित आहेत. अशा स्थितीत या दिवशी भोलेनाथाची पूजा करून, मंत्रोच्चार, तपश्चर्या, श्राद्धविधी केल्यास भविष्यकाळ सुखकर होतो.

हे ही वाचा :

Amit Shah In Kolhapur Live, कोल्हापुरातून अमित शाह लाईव्ह

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss