गणेशोत्सवात बेस्ट बसकडून प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती

गणेशोत्सवात बेस्ट बसकडून प्रवाशांसाठी खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर माहिती

यंदा दोन वर्षांनी नागरिक उत्साहाने महाराष्ट्रात गणेशउत्सव साजरा करणार आहेत. ठिकठिकाणी उत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव दरम्यान भाविक सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी रात्रीचे बाहेर पडतात, अशा वेळी भाविकांची आणि प्रवाश्यांची गैरसोय होय नये म्हणून बेस्ट बसद्वारे ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालवली जाते जाणार आहे. यावेळी 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तसेच, 8 सप्टेंबरपर्यंत मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या 10 दिवसांच्या गणेशोत्सव कालावधीत दक्षिण मुंबईतील विविध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बेस्टने ‘हेरिटेज दूर बससेवा’ चालण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अतिरिक्त बस गाड्या चालवण्याचाही निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. सप्टेंबर दरम्यान २५ विशेष बस रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत मुंबईत धावणार आहेत. यामुळे मुंबईकर आणि मुंबईबाहेरून येणारे पर्यटक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

हेही वाचा : 

५० रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन , दीपक केसरकारांचे वक्तव्य

गणेशोत्सवात दक्षिण मुंबईतील विविध गणपती मंडळांना विशेषता फोर्ट, गिरगाव, खेतवाडी, लालबाग, भायखळा येथे रात्रीच्या वेळी गणपतीच्या दर्शनासाठी येणारे प्रवासी,भाविकांच्या सोयीसाठी खास डबलडेकर हेरिटेज टूर बससेवा चालविण्यात येणार आहे. या बस रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत धावणार आहेत. या बसमार्गाची सुरुवात म्युझियम येथून होऊन पुढे गेट वे आफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट, महर्षी कर्वे रोड, गिरगाव चर्च, प्रार्थना समाज, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, जिजामाता उद्यान, लालबाग असा प्रवास करणार आहे. परतीच्या प्रवासातही हाच मार्ग आहे.या बससेवेसाठी वरच्या व खालच्या मजल्यासाठी अनुक्रमे १५० रुपये आणि ७५ रुपये असे तिकीट दर असणार आहेत.

महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या तयारीतील महत्वाचा भाग म्हणजे ढोल-ताशा…

Exit mobile version