Tirupati मंदिरात दर्शनासाठी भाविकांना विशेष पास सेवा सुरू

तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते. भगवान तिरुपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हे जात असतात.

Tirupati मंदिरात दर्शनासाठी भाविकांना विशेष पास सेवा सुरू

तिरुपती देवस्थान हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान समजले जाते. भगवान तिरुपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हे जात असतात. म्हणूनच देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी विशेष पास सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) आज भक्तांसाठी प्रत्येकी ३०० रुपये किंमतीचे ऑनलाइन कोटा स्पेशल एन्ट्री दर्शन (SED) तिकीट जारी करेल. भाविकांना आज सकाळी १० वाजल्यापासून ऑनलाइन तिकीट बुक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान समितीतर्फे तिकिटांचा ऑनलाइन कोटा हा आजपासून म्हणजेच ९ जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आला आहे. देवस्थानच्या अधिकृत वेबसाइटवर हा कोटा जाहीर करण्यात येत आहे. तर आज सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने ही तिकीट बुकिंग सुरू करण्यात येत आहे. तसेच ३०० रुपये किंमत असलेल्या विशेष दर्शन तिकिटांची बुकिंग आज करण्यात येत आहे. तिरूपती तिरुमाला देवस्थान समितीकडून १२ ते ३१ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३ महिना या कालावधीसाठी विशेष दर्शन तिकिटांचा ऑनलाइन कोटा जारी करण्यात येत आहे. तसेच या कालावधीसाठी विशेष दर्शन तिकिटांचा ऑनलाइन कोटा जारी करण्यात येत आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन ऑनलाईन तिकिटे बुक करावीत असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाइन बुकिंग कसे कराल?

– तिरुमला तिरुपती देवस्थान मंदिराची अधिकृत वेबसाइटच्या संकेतस्थळ उघडा.
– नंतर त्यामध्ये मोबाईल नंबर, कॅप्चा कोड भरा.
– जनरेट ओटीपी हा ऑप्शन सिलेक्ट करा.
– तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला सहा अंकी ओटीपी भरा.
– त्यानंतर ‘लॉगिन’ वर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला कॅलेंडर दिसेल.
– त्यामध्ये बुकिंग डेट सिलेक्ट करा.
– त्यानंतर तिथे दिसणारा अर्ज भरा.

 

हे ही वाचा:

राज ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा रद्द होण्यामागे भाजपचा हात, मनसेच्या बड्या नेत्याचा आरोप

पुण्याच्या अभिजित कटकेने पटकावला हिंदकेसरी किताब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version