spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

३,४०० वंचित मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी NMACC मध्ये ठेवण्यात आला विशेष कार्यक्रम

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC), हे भारतातील मुंबई शहरात स्थित एक परफॉर्मिंग आर्ट्स (Performing Arts) आणि प्रदर्शनाचे ठिकाण आहे, जे ३१ मार्च २०२३ रोजी उघडले गेले.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC), हे भारतातील मुंबई शहरात स्थित एक परफॉर्मिंग आर्ट्स (Performing Arts) आणि प्रदर्शनाचे ठिकाण आहे, जे ३१ मार्च २०२३ रोजी उघडले गेले. मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात रिलायन्स उद्योग (Reliance Industries) समूहातर्फे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आले आहे. भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने या केंद्राची स्थापना करण्यात आली. भारतीय आणि जागतिक कलेच्या प्रदर्शनासाठी ही इमारत उभारण्यात आली आहे.

काही दिवसांआधीच (NMACC) या कल्चरल सेंटरचं उदघाटन करण्यात आलं होत. या कल्चरल सेंटरमध्ये (Cultural Center) अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्यातच आता रिलायन्स फाऊंडेशन समर्थित NGOs मधील ३,४०० वंचित मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना आंतरराष्ट्रीय ब्रॉडवे म्युझिकल (Broadway musical) ‘द साउंड ऑफ म्युझिक’ चा आनंद घेता आला आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी हा शो ऑरगॅनिझ (Organize) केला होता. रिलायन्स फाऊंडेशनने (Reliance Foundation) मुंबईतील विविध ठिकाणांहून ३,४०० मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना आमंत्रित केले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) द्वारे १८ स्वयंसेवी संस्थांसह रिलायन्स कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील यासाठी योगदान दिले होते . शिक्षण आणि क्रीडा कार्यक्रमाद्वारे, रिलायन्स फाऊंडेशन गेली अनेक वर्षे विविध शिक्षण आणि क्रीडा कार्यक्रम आणि उपक्रमांना समर्थन देत आहे. हा विशेष शो रिलायन्स फाऊंडेशनचा मुलांना प्रेरणा देण्यासाठी केलेला एक प्रयत्न होता.

या कार्यक्रमात नीता अंबानी म्हणाल्या, “द साउंड ऑफ म्युझिकला मिळालेला उदंड प्रतिसाद हा NMACC च्या दृष्टीकोनाची पुष्टी आहे. देशभरातील अनेक कुटुंब एकत्र येऊन याचा आनंद लुटताना पाहणे खरोखरच आनंददायी आणि जादुई अनुभव आहे. मी यासाठी हृदयस्पर्शी आहे. आम्ही शेवटचे दोन शो ३,४०० वंचित मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना समर्पित केले आहेत. या खास प्रेक्षकांसोबत या प्रतिष्ठित मैफिलीचा शेवट करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही.”

हे ही वाचा:

Kohli आणि Dhoni च्या संदर्भामध्ये Virender Sehwag ने केले मोठे विधान

K. Chandrashekar Rao यांच्या Bharat Rashtra Samithi ने शड्डू ठोकले; NCP च्या पोटात गोळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss