SSLV D1-EOS-2 Launched : इस्रोच्या “बेबी रॉकेट” चे यशस्वी उड्डाण

यंदा सर्व ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इसरो ने (ISRO) संपूर्ण देशवासियांना एक मोठे गिफ्ट दिले आहे.

SSLV D1-EOS-2 Launched : इस्रोच्या “बेबी रॉकेट” चे यशस्वी उड्डाण

मुंबई :- यंदा सर्व ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. त्यातच आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था मध्ये इसरो ने (ISRO) संपूर्ण देशवासियांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. इस्रोच्या बेबी रॉकेटने यशस्वी उड्डाण केले आहे. ‘बेबी रॉकेट’नं अर्थात एसएसएलवी-D१ नं (SSLV-D1) ईओएस-०२ (EOS-02) आणि आझादी सॅट या उपग्रहांचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

इसरो (ISRO) नवी भरारी घेतली आहे. . भारतानं ‘बेबी रॉकेट’ म्हणजेच सर्वात छोटं प्रक्षेपण यान (Launch Vehicle) लाँच केले आहे. इसरोनं सर्वात पहिलं ‘स्माल सॅटेलाइट लाँच व्हेइकल’ लाँच केलं आहे. या मिशनला इसरोनं SSLV-D1/EOS-02 असं नाव देण्यात आलं आहे. राकेट एसएसएलवी-D१ (SSLV-D1) हे प्रक्षेपण यानने श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून सकाळी ९.१८ वाजता उपग्रह प्रक्षेपण केलं आहे. या प्रक्षेपणाला रविवारी मध्यरात्री ०२. २६ वाजेपासून सुरुवात झाली. रॉकेटच्या उड्डाणाचा खर्चही कमी होणार असून, कमी वजनाच्या उपग्रहांसाठी जगभरातील कंपन्यांना प्रक्षेपणासाठी स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे. इस्रोच्या या नव्या रॉकेटची उंची ३४ मीटर, व्यास २ मीटर आणि वजन १२० टन इतके आहे. १० ते ५०० किलो वजनाच्या उपग्रहांना जमिनीपासून ५०० किमी उंचीवरील कक्षेत पाठवण्याची क्षमता एसएसएलव्ही रॉकेटकडे आहे. फक्त एका आठवड्याच्या कालावधीत, कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने  या रॉकेटची जोडणी शक्य आहे.

पीएसएलव्ही लाँच पॅडवर आणण्यासाठी आणि असेंबल करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु एसएसएलव्ही केवळ २४ ते ७२ तासांत असेंबल करता येते.  SSLV अशा प्रकारे डिझाइन केले आहे की ते कधीही आणि कोठेही लाँच केलं जाऊ शकते. मग ते ट्रॅकच्या मागे लोड होत असेल किंवा मोबाइल लाँच व्हेइकल किंवा कोणत्याही तयार केलेल्या लाँच पॅडवर लाँच केले जाईल. हे या रॉकेटची विशेष खासियत आहेत.

हे ही वाचा :-

राशी भविष्य – 7 August 2022 

Exit mobile version