Stock Market : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची घसरण

Stock Market : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्समध्ये ५०० अंकांची घसरण

भारतीय शेअर बाजारात आजही नकारात्मक संकेत कायम आहेत आणि देशांतर्गत बाजार आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मोठ्या कमजोरीसह उघडले. आज, प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्समध्ये शेअर बाजारात ७०० हून अधिक अंकांची घसरण झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी १-१ टक्क्यांहून अधिक घसरत व्यवहार करत होते. आज सर्व आशियाई बाजार लाल चिन्हात व्यवहार करत होते. शांघाय, निक्केई, हँग सेंग आणि स्ट्रेट टाइम्समध्ये व्यापार मंद राहिला.

हेही वाचा : 

Ghatasthapana Navratri 2022 : घटस्थापना पूजा विधी कशी करावी ?

तांत्रिकदृष्ट्या निफ्टी ५०-डीएमएच्या खाली बंद झाल्याचे स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे तज्ञ म्हणाल्या. यात बियरिश हेड अँड शोल्डर फॉर्मेशनमुळे ब्रेकडाउन दिसून येत आहे. जे आणखी कमजोरीचे संकेत देत आहेत. निफ्टी त्याच्याही खाली आल्यावर १७,१५० वर सपोर्ट दिसतो. १७,००० च्या २००-DMA वरही मजबूत सपोर्ट दिसून येत आहे. दुसरीकडे, निफ्टीला १७,७०० च्या २०-DMA वर रझिस्टंस दिसत आहे. निफ्टी १७,५००च्या पुट बेसच्या खाली घसरला आहे. यामध्ये, पुढील सपोर्ट १७,००० वर दिसतो आहे.

शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांचे वादग्रस्त व्यक्तव्य चर्चेत म्हणाले, ‘खाज का निर्माण झाली?

अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय बाजारही शेवटच्या ट्रेडिंग सत्रात मोठ्या घसरणीने बंद झाले. दुसरीकडे, आशियाई बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथेही घसरण दिसत आहे. SGX निफ्टी सुमारे १८० अंकांनी घसरला तर डाऊ फ्युचर्समध्येही सुमारे १७० अंकांची मोठी घसरण आहे.

Navratri 2022 : नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये देवीच्या शैलपुत्री रुपाची महापूजा

Exit mobile version