spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जनआक्रोश मोर्चात घोषणा देणाऱ्या दुर्गा भोसले-शिंदे यांचा अकस्मात मृत्यू

ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. हे ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलनआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीपार पडले. रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच हा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिलाच मोर्चा होता

ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. हे ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलनआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीपार पडले. रोशनी शिंदे या शिवसेना पदाधिकारी महिलेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच हा मोर्चा पोलीस आयुक्तालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेनेतील फुटीनंतरचा हा पहिलाच मोर्चा होता. त्यामुळे सर्वच शिवसैनिक या मोर्चाला एकवटले होते. यावेळी उद्धव बाळासाहेब गटाच्या शिवसैनिकांकडून अगदी पोटतिकडीने घोषणा दिल्या जात होत्या. या मोर्चामध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला जात होता. यावेळी या मोर्चात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे देखील सामील झाल्या होतात. यावेळी युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे सुद्धा मोर्चात जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध नोंदवत होत्या.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले-शिंदे घोषणा देत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले या मुंबईच्या कंबाला हिल परिसरात राहतात. त्या अवघ्या 30 वर्षाच्या आहेत. सदैव हसतमुख, खूप प्रेमळ अशी या ताईची ओळख होती. या घोषणा आणि नारेबाजी देत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तातडीने विश्रांती घेण्यास सागितले. तसेच त्यांना तात्काळ उपचारासाठी मुंबईला पाठवले. दुर्गाताई यांना लगेचच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच काल रात्री 1.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

युवा सेनेच्या सचिव दुर्गाताई भोसले यांनी आपले संपूर्ण तारुण्य तिने पक्षाच्या उन्नतीसाठी खर्च केले. लग्नानंतरही हा समाजसेवेचा पिंड सोडला नाही. शिवसेनीतील बंडानंतरही नेतृत्वासोबत प्रामाणिक राहात त्यांनी निरपेक्षपाने पक्षासाठी काम केले. हाती आलेल्या अगदी कालपर्यंत तिच्या फेसबुकवर शेयर केलेल्या पोस्टवरून कळते की ती पक्षासोबत किती एकनिष्ठ होती हे कळते. हाती आलेल्या सूत्रानुसार दुर्गाताई भोसले शिंदे यांच्या मागे पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी 5 च्या सुमारास धीरज अपार्टमेंट, पेडर रोड, जसलोक हॉस्पिटलच्या बाजूला, कंबाला हिल येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पार्थिवावर वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हे ही वाचा : 

RCBvsKKR, आज ईडन गार्डन्सवर रंगणार कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

भाजपचा आज ४३व्या वर्धापनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधले

साईबाबांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर दिलं धीरेंद्र शास्त्रींनी दिले स्पष्टीकरण

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss