spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक २१ ते २३ जून या ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि इतर प्रमुख नेते तसेच आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिनांक २१ ते २३ जून या ३ दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि इतर प्रमुख नेते तसेच आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश होता. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर पिचाई यांनी कंपनीच्या वतीने मोठी घोषणा केली आहे.

गुगलचे सीईओ म्हणाले आहेत की कंपनी गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक (फायनान्शियल टेक्नॉलॉजी) ऑपरेशन सेंटर उघडणार आहे. यासोबतच सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाचेही कौतुक केले . एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पिचाई म्हणाले की, अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यात पंतप्रधान मोदींना भेटणे ही सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही पंतप्रधानांना सांगितले की Google भारताच्या डिजिटायझेशन फंडमध्ये $10 अब्जची गुंतवणूक करत आहे. आम्ही गुजरात इंटरनॅशनल फिन-टेक (GIFT) सिटी, गुजरात येथे आमचे ग्लोबल फिनटेक ऑपरेशन्स सेंटर सुरू करण्याची घोषणा करत आहोत.”

सुंदर पिचाई यांच्या व्यतिरिक्त, इलॉन मस्क, ऍपलचे सीईओ टिम कुक, स्पेस एक्स, टेस्ला आणि ट्विटरसह अनेक कंपन्यांचे बॉस यांच्यासह शीर्ष अमेरिकन उद्योगपतींनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर एलोन मस्क यांनी स्वत:ला त्यांचा चाहता असल्याचे घोषित केले. इलॉन मस्क म्हणाले की, मी भारताच्या भविष्याबद्दल खूप उत्सुक आहे. मला वाटते की जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक शक्यता आहेत. टेस्लाचे मुख्य कार्यकारी एलोन मस्क म्हणतात की त्यांची इलेक्ट्रिक कार कंपनी भारतात लवकरात लवकर गुंतवणूक करण्याच्या संधी शोधत आहे. तर डिजिटल इंडियाचे कौतुक करताना गुगलचे सीईओ म्हणाले की, डिजिटल इंडियासाठी पंतप्रधानांचे व्हिजन वेळेच्या आधीचे होते आणि आता मी याकडे एक ब्लूप्रिंट म्हणून पाहतो ज्याचे इतर देश अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Latest Posts

Don't Miss