spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sunita Williams Birthday : भारतीय वंशाची दुसरी महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स यांच्याविषयी माहित आहे का तुम्हांला ? जाणून घ्या सविस्तर…

Sunita Williams Birthday : आज १९ सप्टेंबर म्हणजेच भारतीय-अमेरिकन अंतराळवीर (Astronaut) आणि यूएस नेव्ही सदस्य सुनीता विल्यम्स यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ सालामध्ये ओहायोमधील युक्लिड (Euclid ) शहरात झाला. तिचे वडील भारतातील गुजरातमधील (Gujrat) तर आई स्लोव्हेनियाची (Slovenia ) आहे. त्याचमुळे सुनीताचे भारताशी असलेले नाते घट्ट आहे. सध्या ५९ वर्षीय सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात  आहेत. यापूर्वी २००६ आणि २०१२ मध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या. सुनीता विलियम्स या अंतराळात जाणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. सुनीता विलियम्सच्या आधी कल्पना चावला (Kalpana Chawla) अंतराळात गेल्या होत्या.

सुनीता विल्यम्सने (Sunita Williams) ने मॅसॅच्युसेट्समधील नीडहॅम हायस्कूलमध्ये (Needham, सुनीता विल्यम्स Massachusetts )आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमीमधून (Naval United academy )भौतिक विज्ञानात बॅचलर पदवी घेतली व अभियांत्रिकी व्यवस्थापनात (Engineering Management) पदव्युत्तर पदवी घेतली. सहा महिन्यांच्या तात्पुरत्या असाइनमेंटनंतर त्यांची मूळ डायव्हिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. १९९८ सालामध्ये सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ प्रवासाचे प्रशिक्षण सुरू केले.

२००६ मध्ये १९५ दिवस तर २०१२ मध्ये १२७ दिवस सुनीता विलियम्स अंतराळात राहिल्या होत्या अशी माहिती नासाकडून (NASA) मिळाली होती. सुनीता विलियम्सने तिच्या मुलाखतीत एक अंतराळ प्रवासाशी संबंधित एक रंजक गोष्ट शेअर केली. त्यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासादरम्यान भगवद्गीता, एक गणपतीची मूर्ती आणि समोसे सुद्धा सोबत नेले होते. सुनीता विलियम्स यांना अनेक पदके आणि सन्मान मिळाले आहेत. त्यात दोन डिफेन्स सुपीरियर सर्व्हिस मेडल (Defense Superior Service Medal ), दोन नेव्ही कमेंडेशन मेडल (Navy Commendation Medal), लिजन ऑफ मेरिट (Legion of Merit), मरीन क्रॉप अचिव्हमेंट मेडल (Marine Crop Achievement Medal) यांचा समावेश आहे.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss