Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Sunita Williams अडकली अंतराळात, १२ दिवस झाले तरी बिघाड दूर नाही

१३ जूनला परतणार होते पण, गेल्या १२ दिवसांपासून दोघेही काही बिघाडामुळे अंतराळात अडकून पडले आहे. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनियर दुरुस्त करू शकले नाहीत.

५ जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टाने (starliner spacecraft) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि त्यांचे सहकारी बूच विल्मोर (butch wilmore) हे अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. ते १३ जूनला परतणार होते पण, गेल्या १२ दिवसांपासून दोघेही काही बिघाडामुळे अंतराळात अडकून पडले आहे. गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनियर दुरुस्त करू शकले नाहीत. त्याचे अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम (helium) लीक होत असल्याने ते परतू शकत नाही. आता त्यांच्याकडे केवळ २७ दिवसांचे इंधन शिल्लक आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुनीता आणि बूच यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता परतण्याची तारीख अद्याप दिली गेली नाहीये. ५ जून रोजी सकाळी १० वाजून ५२ मिनिटांनी फ्लोरिडा (Florida) येथील कॅप कॅनवेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून (Cape Canaveral Space Force station) बोईंगचा स्टारलाइनर कॅप्सूल रवाना झाला होता. २५ तास उड्डाण केल्यानंतर इंजिनियरांना स्पेसशिपमधील थ्रस्टर सिस्टीम मध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर अंतराळ यान पुन्हा परत आणण्याचा निर्णय स्थगित केला गेला.

अंतराळात सुनीता आणि बूच दोघेच जरी अडकले असले तरी नासाने दोघांना कुठलाही धोका नसल्याचे सांगितले आहे. त्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी इंजिनियर प्रयत्न करत आहेत. अंतराळ यानाची क्षमता ४५ दिवसाची आहे व त्यातले १८ दिवस झाले आहेत. आता केवळ २८ दिवस राहिले आहेत. नासाचे हे दुसरे अंतळायान असून हे पहिल्यांदाच अंतराळात गेले आहे. नासासोबत बोइंगने 4.5 अब्ज डॉलरचा करार केला आहे. त्यातील 1.5 अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.

हे ही वाचा

संधी मिळाली तर शेतकरी कुटुंबातील तरूण…Nilesh Lanke च्या शपथविधीवर Jitendra Awhad काय म्हणाले?

Kangana Ranaut ने महाराष्ट्र सदन मध्ये विचारपूस केली तर Sanjay Raut ला मिरच्या झोंबल्या, Nitesh Rane यांची खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss