spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

१९९५ मध्ये सुझलान एनर्जीची स्थापना करून तांतीने भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला.

भारतातील ‘विंड मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुझलॉन एनर्जीचे संस्थापक तुलसी तांती यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ६४ व्या वर्षी निधन झाले. १९५८ मध्ये गुजरातमधील राजकोट येथे जन्मलेले तांती हे १९९५ मध्ये स्थापन केलेल्या सुझलॉन एनर्जीच्या प्रवर्तकांपैकी एक होते. तांती अहमदाबादहून पुण्याला जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी निधी आणि मुलगा प्रणव असा त्यांचा परिवार आहे. तांती हे इंडियन विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते, ज्यांना १९९५ मध्ये सुझलॉन एनर्जीच्या स्थापनेसह भारतात पवन क्रांतीचे नेतृत्व करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.

पवन क्रांतीचे नेतृत्व करण्याचे श्रेय

तुलसी तांती यांनी १९९५ मध्ये कापडाचा व्यवसाय सुरू केला. मात्र विजेच्या तुटवड्यामुळे त्यांना उत्पादनात घट येत होती. यानंतर, कापड कंपनीच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी १९९५ मध्ये पवन ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायामध्ये पाऊल टाकले आणि सुझलॉन एनर्जीची स्थापना केली.

हरित ऊर्जा पर्यायासाठी दिले प्रोत्साहन

२००१ मध्ये त्यांनी कापडाचा व्यवसाय विकला आणि २००३ मध्ये, सुझलॉनला दक्षिण-पश्चिम मिनेसोटामध्ये २४ टर्बाइन पुरवण्यासाठी डॅनमार अँड असोसिएट्सकडून यूएसएमध्‍ये पहिली ऑर्डर मिळाली. सध्या सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप ८,५३५.९० कोटी रुपये आहे. १९९५ मध्ये सुझलान एनर्जीची स्थापना करून तांतीने भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्या विस्तारासाठी, एक नवीन व्यवसाय मॉडेल स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये कंपन्यांना ग्रीन एनर्जी पर्यायांचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले गेले. तुलसी तांती यांच्या मार्गदर्शनाखाली सुझलान एनर्जीने भारताव्यतिरिक्त युरोपीय बाजारपेठांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित केले. कंपनीची जर्मनी, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये R&D केंद्रे देखील आहेत.

हे ही वाचा:

फुटबॉल मॅचदरम्यान मृत्यूचा थरार, हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

गांधी जयंतीनिमित्त पीएम मोदींसह सोनिया गांधींही पोहचल्या राजघाटावर, बड्या नेत्यांकडून राष्ट्रपिता यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss