‘स्वालबार्ड’ एक असं बेट जेथे मरण्यास आहे मनाई…

मृतदेह पुरल्यानंतर, फ्रीझरमध्ये सुरक्षित ठेवल्याप्रमाणे थडग्यात तो मृतदेह कितीतरी काळ टिकून राहतो.

‘स्वालबार्ड’ एक असं बेट जेथे मरण्यास आहे मनाई…

स्वालबार्ड हा नॉर्वे देशाचा एक भाग आहे, जो पृथ्वीच्या सर्वात उत्तरेकडील भाग असल्याचे म्हटले जाते. इथले हवामान बऱ्यापैकी थंड आहे. बेटावरील तापमान ३० डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाते आणि वाढले तर ते ७ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होत नाही. या बेटावर थायलंडसह सुमारे ४० देशांतील लोक राहतात. पण, हे बेट फार कुणाच्या ओळखीचे नसल्याने येथे काही विचित्र कायदे असल्याचा दावा केला अनेकांकडून केला जातोय. जसे की येथे मरणे बेकायदेशीर आहे. बाळाच्या जन्मासाठी रुग्णालयात लेबर वॉर्ड नाहीत. रुग्णालयात जाणीवपूर्वक फारशा सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. येथे पक्षी मारण्यास मनाई आहे, तसेच येथे मांजर पाळण्यासही बंदी आहे. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय आहेत स्वालबार्डचे विचित्र कायदे:

कठोर हवामानामुळे, स्वालबार्डमध्ये मृतदेह पुरण्यास परवानगी नाही कारण येथे पुरलेले मृतदेह कधीही कुजत नाहीत. मृतदेह पुरल्यानंतर, फ्रीझरमध्ये सुरक्षित ठेवल्याप्रमाणे थडग्यात तो मृतदेह कितीतरी काळ टिकून राहतो. असा कोणताही लेखी कायदा इथे नसला तरी जी कुणी व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असेल तिला उपचारासाठी बेटावरून नॉर्वेला हलवले जाते.

या बेटावरीलच आश्चर्यचकित करणारी एक घटना म्हणजे स्वालबार्डमध्ये एक लहान स्मशानभूमी आहे, जिथे १९१८ मध्ये ७ मृतदेह पुरण्यात आले होते आणि १९९८ मध्ये उत्खनन केल्यावर हे मृतदेह सुरक्षित बाहेर आले. खूप काळापूर्वी पुरलेले हे मृतदेह ना कुजले ना विघटित झाले होते. हे घडले कारण येथील तापमान ३० अंश सेल्सिअस ते ७ अंश सेल्सिअस दरम्यानच असते.

स्वालबार्डमधील एखाद्याला गंभीर आजार असल्यास त्याला ताबडतोब नॉर्वेला हलवले जाते कारण येथील रुग्णालय फार मोठे नाही. बेटावर कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. जर कोणी आजारी असेल तर त्याने नॉर्वेला जाऊन उपचार करावेत. बाळाला जन्म देण्यासाठी येथील रुग्णालयात लेबर वॉर्डही नाही.

स्वालबार्डमध्ये दारू खरेदीसाठीही कडक कायदा आहे. येथे राहणारे लोक दर महिन्याला ठराविक मर्यादेतच दारू खरेदी करू शकतात. जर त्यांनी पर्यटकांसाठी दारू खरेदी केली तर त्यांना त्यांचा बोर्डिंग पास दाखवावा लागतो. नाहीतर मग बोर्डिंग पास दाखवल्याशिवाय त्यांना दारू मिळत नाही.

स्वालबार्डमध्ये जेव्हा कोणी घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला सोबत आगीची मशाल घेऊन जावे लागते कारण इथे ध्रुवीय अस्वलाच्या हल्ल्याचा धोका असतो. १९७० पासून इथल्या लोकांवर ध्रुवीय अस्वलाने किमान पाच वेळा हल्ले केले आहेत. ध्रुवीय अस्वलाच्या बळींपैकी एक महिला गंभीर जखमी झाली होती.

हे ही वाचा:

Video Viral : टिकटॉक स्टार महिला कंडक्टर निलंबित,ऑन ड्युटी रिल्स पडलं महागात

Nobel Prize : स्वीडनचे शास्त्रज्ञ स्वांते पाबो यांना नोबेल पुरस्कार जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version