Thursday, July 4, 2024

Latest Posts

T20 World Cup च्या विजयावर Celebrity कडून शुभेच्छांचा वर्षाव

संपूर्ण देशभरात टीम इंडियाच्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४(ICC T20 World Cup 2024) विजयानंतर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

संपूर्ण देशभरात टीम इंडियाच्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२४ (ICC T20 World Cup 2024) विजयानंतर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शनिवार २९ जून हा दिवस तर इतिहास जमा ठरला आहे. सर्वत्र जल्लोष आणि सेलिब्रेशनच दिसत आहे. टीम इंडियाने टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरून सर्व भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. देशभरात कौतुकाचं आनंदाचं आणि अभिमानचं वातावरण पसरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड सोबतच मराठी कलाक्षेत्रातील कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरुवातीपासूनच भारतीयांची कामगिरी ही कौतुकास्पद होती. त्यानंतर फायनल तिकीट मिळवत पुन्हा एकदा भारतीय संघ विश्वचषकाच्या रांगेत येऊन पोहचला आणि तो मिळवलाही. अगदी सामान्य जनतेपासून ते दिग्गजापर्यंत या खेळाडूंचं अगदी भरभरून कौतुक केले जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत टीम इंडियाचे कौतुक केले आहे. अभिनेते मनोज बाजपेयी यांनी “क्या जबरदस्त जीत है, लहरा दो” असे कॅप्शन दिले आहे, तसेच या अभूतपूर्व विजयासाठी भारतीय क्रिकेट संघाचा खूप अभिमान आहे असंही ते म्हणाले. तसेच “आज वर्ल्ड कप नही, दिल जीत लिया हमेशा के लिए” असं कॅप्शन देत कार्तिक आर्यनने पोस्ट शेअर करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे. एव्हरग्रीन अभिनेत्री काजोलने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “भारताने किती वर्षानंतर हा वर्ल्ड कप जिंकला याचा मला खूप आनंद होतोय”. तर “आपण ट्रॉफी घरी आणली” असं कॅप्शन देत अभिनेत्री करीना कपूर खानने भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. याचबरोबर अभिनेता सलमान खान, रणबीर सिंग, अर्जुन कपूर, माधुरी दीक्षित या कलाकारांनी कौतुकाचा वर्षावच केला आहे.

बॉलिवूड कलाक्षेत्रातील कलाकारांसोबतच मराठी कलाक्षेत्रातील अमृता खानविलकर, हृषीकेश जोशी, सई ताम्हणकर, पुष्कर जोग, पृथ्वीक प्रताप, प्रसाद ओक अशा सगळ्यांनी आपल्या भारतीय संघाचं भरभरून कौतुक केले आहे. हृषीकेश जोशीने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “ही खरी फायनल… वेल प्लेड आफ्रिका, हार्ड लक, जिंकाल तुम्ही पुढे कधीतरी”. पुढे त्याने असे म्हटले आहे की, “एका मॅचला इतके टर्निंग पॉईंट्स … कोहली, अर्शदीप, बुमराह हार्दिक सूर्य अफाट….” तसेच सई, अमृता यांनीदेखील पोस्ट करत खेळाडूंचे भरभरून कौतुक केले आहे. त्यामुळे यंदा भारतीयांचं विश्वचषक जिकंण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होऊन त्याचा आनंद देशभरात साजरा केला जातो.

हे ही वाचा :

T20 WORLD CUP : PANDYA आणि NATASAचा व्हिडीओ कॉलवर संवाद ; नात्यात सर्वकाही अलबेल

T20 WORLD CUP : “आपण विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवला.” ; शरद पवारांनी केले कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss