माश्यासोबत सेल्फी घेणं पडलं महाग ! मजेशीर व्हिडिओ होतोय वायरल

सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडिओ हे वारंवार शेअर होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे गंभीर असतात तर काही व्हिडिओ हे मजेशीर, गंमतीशीर असतात.

माश्यासोबत सेल्फी घेणं पडलं महाग ! मजेशीर व्हिडिओ होतोय वायरल

सध्या सोशल मीडियावर (Social media) अनेक व्हिडिओ हे वारंवार शेअर होत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे गंभीर असतात तर काही व्हिडिओ हे मजेशीर, गंमतीशीर असतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पोट धरून हसाल. तुम्ही या व्यक्तीच्या जागी असता तर एवढी गडबड केल्यावर नक्कीच डोकं धरून बसले असते. पण त्या व्यक्तीची चूक काय तर एक सेल्फी.

एक सेल्फी तुम्हाला किती महाग पडू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. सेल्फीची क्रेझ तुम्हाला माहीत आहेच. पण सेल्फीच्या नादात इतकं नुकसान झाल्यानंतर तुमची झोप नक्कीच उडून जाईल. या व्यक्तीने बोटीत उभं राहून माशासोबत सेल्फी काढला. लागोपाठ सेल्फी काढल्यानंतर शेवटी असं काही घडतं की पाहून तुम्हाला हसू नक्कीच आवरणार नाही .

लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ कोटी २५ लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. यावर यूजर्सकडून खूप मजेदार प्रतिक्रिया येत आहेत.

हे ही वाचा:

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास आता महागणार

Navratri 2022 : नवरात्र हा सण का साजरा केला जातो ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version