Tata Marathon Mumbai, दोन वर्षानंतर मुंबईत पुन्हा टाटा मॅरेथॉन स्पर्धा सुरु, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी

Tata  Marathon Mumbai, दोन वर्षानंतर मुंबईत पुन्हा  टाटा मॅरेथॉन स्पर्धा सुरु, मोठ्या संख्येने नागरिक सहभागी

आजची टाटा मुंबई मॅरेथॉन या तब्बल दोन वर्षांनंतर आयोजित झालेल्या स्पर्धेसाठी मोठ्याप्रमाणात मुंबईकरांनी भाग घेतला होता . तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या स्पर्धेत हजेरी लावली होती.

आतापर्यंत कोरोनामुळे अनेक गोष्टी खेळ, स्पर्धा तब्बल दोन वर्ष बंद ठेवाव्या लागल्या होत्या. पण आता पुन्हा दोन वर्षानंतर मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पहाटे ५ अजून १५ मिनिटांनी या स्पर्धेची सुरुवात झाली. मुख्य म्हणजे या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते.

टाटातर्फे दर वर्षी मुंबई मॅरेथॉन (Mumbai Marathon) स्पर्धा आयोजित करण्यात येते. पण कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्ष मुंबईत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करता आली नाही. आता दोन वर्षानंतर दरवर्षीप्रमाणेच पुन्हा यंदाही मुंबईत टाटातर्फे मुंबई मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. L पहाटे ५ अजून १५ मिनिटांनी या स्पर्धेची सुरुवात झाली. तसेच आजच्या या टाटा मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांसाठी खास गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. बोरीवलीहून पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकल सुटली. वाहतुकीमुळे स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून स्पर्धा आयोजित केलेल्या मार्गावरील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे स्वागत हे चक्क ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेत मोठा उत्सवच पाहायला मिळाला आहे. यादरम्यानच टाटाकडून आयोजित हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. माहीम येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. या हाफ मॅरेथॉनला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar ) यांनी हिरवा झेंडा दाखवला. टाटाकडून आयोजित या मुंबई मॅरेथॉनमध्ये माहीम इथे हाफ मॅरेथॉन (Half marathon) पोलीस कपमध्ये तब्ब्ल १४ हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई पोलिसांनी आणि आयोजकांनी जागोजागी लोकांसाठी पाण्याची सुविधा केली आहे. मेडिकलची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

Kishori Pednekar यांच्यासह अन्य चार जणांवर एसआरए प्रकरणी FIR दाखल

भेगा पडलेल्या ओठांची काळजी घेण्याव्यतिरिक्त अशा पद्धतीनेही होऊ शकतो पेट्रोलियम जेलीचा वापर, जाणून घ्या फायदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version