spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Taylor Swift’s Cat’s Networth टेलर स्विफ्टची मांजर आहे जगातील सर्वात महाग मांजर

ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) विजेती हॉलिवूड गायिका (Hollywood Singer) टेलर स्विफ्टकडे (Taylor Swift) असलेले पाळीव प्राणी हे जगातील सर्वात महागडे प्राणी आहे.

ग्रॅमी पुरस्कार (Grammy Award) विजेती हॉलिवूड गायिका (Hollywood Singer) टेलर स्विफ्टकडे (Taylor Swift) असलेले पाळीव प्राणी हे जगातील सर्वात महागडे प्राणी आहे. तसेच हे प्राणी अनेक लोकांपेक्षा श्रीमंत आहे. हि गोष्ट वाचून अर्थात तुम्हालाही नक्कीच आश्यर्य वाटेल परंतु हि गोष्ट खरी आहे. टेलर स्विफ्टच्या लाडक्या मांजरीचे नाव ऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) आहे. हि जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑलिव्हिया बेन्सन हि मांजर कोट्यधीश आहे. टेलर स्विफ्टजवळ जी मांजर आहे तिची किंमत तब्बल ८०० कोटी रुपये (९७ दशलक्ष डॉलर) इतकी आहे. हे जगातील तिसरे सर्वात महाग पाळीव प्राणी आहे.

२०१४ पासून टेलर स्विफ्टकडेऑलिव्हिया बेन्सन (Olivia Benson) हि पाळीव मांजर आहे. ऑलिव्हिया ही एक स्कॉटिश फोल्ड फेलाइन जातीची मांजर आहे. टेलरकडे ऑलिव्हिया सोबतच आणखी २ मांजरी आहेत. त्यांची नाव मेरेडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन आहेत. परंतु सर्वात श्रीमंत मांजरीच्या यादीमध्ये फक्त ऑलिव्हियाचे नाव आहे. फोर्ब्स चा २०२२ चा अहवाल पहिला तर, पॉप स्टार टेलर स्विफ्टची एकूण संपत्ती ४७०० कोटी आहे.

पॉप स्टार टेलर स्विफ्टची पाळीव मांजर ऑलिव्हिया बेन्सन जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिची लाडकी मांजर ऑलिव्हिया बेन्सन अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये दिसली आहे. ती अनेक व्हिडिओंमध्ये देखील दिसली आहे. सध्या ऑलिव्हिया ९७ दशलक्ष डॉलर संपत्तीची मालकीण आहे. AllAboutCats.com या वेबसाईटच्या माहितीनुसार, ऑलिव्हिया जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजरीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉप स्टार टेलर स्विफ्टची पाळीव मांजर ऑलिव्हिया बेन्सनचे इन्स्टाग्रामवर अकाउंट देखील नाही तरी AllAboutCats.com च्या मते, ऑलिव्हियाचे जगभरात अनेक चाहते आहेत.

तसेच मांजरीची एवढी किंमत कशी पडली हेही या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच, २०२० मध्ये टेलर स्विफ्टने या मांजरीचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ऑलिव्हिया बेन्सन ही पलंगावर बसलेली दिसत आहे. त्या फोटोला दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

हे ही वाचा:

Covid 19, चीनमध्ये वाढतोय कोरोनाचा उद्रेक, भारतातील स्थिती घ्या जाणून

पत्रकार दिनानिमित्त जाणून घ्या कोण आहेत बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी महाराष्ट्राला दिले पहिले वृत्तपत्र?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss