Teachers Day 2024 : भारतात ५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा करतात माहित आहे का तुम्हांला ? जाणून घ्या इतिहास…

Teachers Day 2024 : भारतात ५ सप्टेंबरलाच शिक्षक दिन का साजरा करतात माहित आहे का तुम्हांला ? जाणून घ्या इतिहास…

Teachers Day 2024 : शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञान देत असतात. शिक्षक हे समाजात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. एक संपूर्ण पिढी शिक्षित बनवण्याचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यात शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षण दिन साजरा केला जातो. दरवर्षी ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथी दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. ठिकठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन मोठया उत्साहात पार पाडला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थीच एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत असतात. जेणेकरून त्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि आव्हान लक्षात येऊ शकतील.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvepalli Radhakrishnan) हे माजी राष्ट्रपती, विद्वान आणि कुशल राजकारणी होते. दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करतो. डॉ. राधाकृष्णन हे १९६२ ते १९६७ पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. याआधी त्यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये शैक्षणिक पदे भूषवली. गुरु शिष्याचे नाते असलेली अनेक मोठी उदाहरणे आपल्याकडे होऊन गेली आहेत.

भारतात पहिल्यांदा शिक्षण दिन कधी साजरा केला होता ?
शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुचली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान ठरले आहे. डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला, ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुचवली. तेव्हा त्यांनी हा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे सुचवले. तेव्हापासून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जाऊ लागला.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात उलथापालथ होणार! संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, ‘अनेक नेते आमच्या संपर्कात…’
ST Bus Strike: माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती, ऐन गणेशोत्सवात नागरीकांना..काय म्हणाल्या Supriya Sule?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version