Teachers Day 2024: शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना पाठवा ‘हे’ खास संदेश

शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतो. शिक्षक हे आपल्या देशाचा कणा आहेत आणि तरुण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतात. भारतात शिक्षक-विद्यार्थी हे नातं सांस्कृतिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना शुभेच्छा देतात.

Teachers Day 2024: शिक्षक दिनानिमित्त तुमच्या आवडत्या शिक्षकांना पाठवा ‘हे’ खास संदेश

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती भारतात शिक्षक दिन किंवा शिक्षक दिवस म्हणून साजरी केली जाते. शिक्षक दिन हा समाजासाठी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करतो. शिक्षक हे आपल्या देशाचा कणा आहेत आणि तरुण पिढीला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करतात. भारतात शिक्षक-विद्यार्थी हे नातं सांस्कृतिक परंपरांमध्ये खोलवर रुजलेलं आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना शुभेच्छा देतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय गुरुंप्रती तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुमच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना संदेश, कोट्स आणि एसएमएसच्या मार्फत शुभेच्छा पाठवू शकता.

शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शतशः नमन !
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
की म्हणजे कर्तव्यनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

काय देऊ गुरुदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

आयुष्याला आकार, आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… !

लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले
बोलता बोलता गुंफावे ते शब्द ओठातले
रडता रडता लपवावे ते पाणी डोळ्यातले
अन हसता हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविना न होई जागी सन्मान
जीवन भवसागर तराया
चला वंदू गुरुराया
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा
जगण्यातून जीवन घडविणारा तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या
ज्ञानरूपी गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे ही वाचा:

Exit mobile version