भारत जोडोला तात्पुरती स्थगिती, बड्या नेत्याच्या मुत्यूने काँग्रेसमध्ये व्यक्त केली हळहळ

सकाळी ८. ४५ वाजण्याच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले तसेच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष सिंह चौधरी हे ७६ वर्षांचे होते.

भारत जोडोला तात्पुरती स्थगिती, बड्या नेत्याच्या मुत्यूने काँग्रेसमध्ये व्यक्त केली हळहळ

मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भारत जोडो” यात्रेनिमित्त देशातील वेगवेगळ्या शहरातून चालत आहेत. यामध्ये अनेक नेत्यांनी सुद्धा सहभाग दर्शवला होता. राज्यभरातूं या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, राहुल यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोष सिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर संतोष सिंह यांना हार्ट अटॅक आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र, उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.

भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात आहे.ही यात्रा दक्षिणेकडून सुरु करण्यात आली होती आणि उत्तरेकडे त्याची समाप्ती करण्यात येणार आहे. परंतु यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.तसेच खासदार संतोष सिंह चौधरी यांचा फगवाडा येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, ट्विटरच्या माध्यमातून दिली. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी देखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये दाखल झाली आहे. आज लुधियानातील लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेमध्ये खासदार संतोष सिंह चौधरी हे देखील राहुल गांधींच्या जथ्थ्यासोबत चालत होते.

मात्र सकाळी ८. ४५ वाजण्याच्या सुमारास संतोष सिंह चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले तसेच त्यांच्या छातीत दुखू लागल्याने यात्रेतील रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तत्काळ फगवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संतोष सिंह चौधरी हे ७६ वर्षांचे होते.

संतोष सिंग चौधरी यांना रुग्णालयात दाखल केले त्यावेळी राहुल गांधी यांनी फिल्लोर येथील भट्टिया पर्यंतची यात्रा पूर्ण केली होती. त्या ठिकाणी काही काळ थांबा घेण्यात आला. मात्र संतोष सिंह यांच्या निधनाची माहिती मिळताच काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधी रुग्णालायाच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे भारत जोडो यात्रा काही काळापुरती स्थगित करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

काहीतरी वेगळं शिजतंय, अजित पवारांनी आधीच दिला होता इशारा

Makar Sankranti 2023, आज संक्रांतीचा पहिला दिवस, भोगीच्या दिवशी नक्की काय करतात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version