spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Madhya Pradesh मध्ये भीषण अपघात, अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या तीन बसला भीषण अपघात

काल दि. २४ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३ बसला भीषण अपघात झाला आहे.

काल दि. २४ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ३ बसला भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव ट्रकने ३ बसला टक्कर दिली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५० जण जमखी झाले आहेत.

 मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रीवा पोलिसांनी माहिती देत सांगितलं की, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५० जण जखमी झाले असून त्यापैकी १५ -२० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात मध्य प्रदेशातील रीवा आणि सिधी जिल्ह्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झाला आहे. काल दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली आहे. तीन बसला ट्रकने धडक दिली. जखमींवर रीवा आणि सिद्धी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी रात्री उशिरा रेवा येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच समोर आलेल्या माहिती नुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रॅलीनंतर लोक बसमध्ये चढत होते. अपघाताच्या वेळी बस रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. सतना येथे आयोजित कोल महाकुंभातील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमानंतर या बसेस परतत होत्या. ही दुर्घटना सिधी जिल्ह्यातील मोहनिया बोगद्याजवळ घडली आहे.

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

भारतामधील प्रसिद्ध दिगर्शक संजय लीला भन्साळी यांचे काही हिट चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss