मनालीमध्ये साताऱ्यातील युवकाचा भीषण अपघात, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने झाला दुर्दैवी मृत्यू

मनालीमध्ये साताऱ्यातील युवकाचा भीषण अपघात, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने झाला दुर्दैवी मृत्यू

Paragliding Accident In Manali : हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली (Kullu Manali) येथे पॅराग्लायडिंग (Paragliding in Kullu-Manali) करताना पॅराशूटचा बेल्ट निसटून खाली पडल्यामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू झालेला युवक हा सातारा (Satara) जिल्ह्यातील शिरवळ (Shirwal) येथील आहे. सूरज शहा (Suraj Shah) असे या दुर्देवी युवकाचे नाव आहे. तो ३० वर्षांचा होता. या घटनेमुळे शिरवळ शहरावर शोककळा पसरली आहे. सूरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

इतर कुठल्याही खेळाप्रमाणे हा खेळही संभाव्य धोकादायक (harmful )असतो. जखमी होण्याचा धोका हा अयोग्य प्रशिक्षण , किंवा व्यवस्थित सांधनांचा वापर न केल्याने निर्माण होतो . बहुदा अपघात खराब हवामानामुळे होत असतात. असाच एक अपघात हिमाचल प्रदेशातील कुलू-मनाली (Kullu Manali) येथे पॅराग्लायडिंग (Paragliding in Kullu-Manali) करताना झाला . पॅराग्लायडिंग (paragliding ) हा हवेत उड्डाण विषयक साहसी खेळाचा प्रकार आहे . यात विशिष्ट प्रकारचे कापड आणि दोऱ्याचा उपयोग करून पंख बनवले जाते व हार्नेसला जोडून त्याच्या साहाय्याने उड्डाण भरणारा त्यात बसतो . गल्यडर हा कोणत्याही धातूच्या समावेशाने बनवला जात नाही . तो हवेच्या सहाय्याने आकाशात भरारी घेत असतो. पंखाचा आकार हा सस्पेंशन वायर्स आणि हवेच्या उच्च दाबामुळे व्यवस्थित राहतो. ग्लायडरचा वेग हा हवेच्या गतीवर अवलंबून असतो .

हेही वाचा :

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ठाकरे गट होणार आक्रमक

सूरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता. सुरजचे वडील उद्योजक आहेत. सुरज मित्रांसोबत तो ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज सुमारे ८०० फुटावरून खाली पडला असल्याचे सांगण्यात येते. या अपघातानंतर सूरजसोबत असणाऱ्या त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. सूरज आपल्या मित्रांसह शनिवारी पॅराग्लायडिंग करण्यासाठी डोभी येथे दाखल झाले होते. डोभी येथून पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळेतच सूरजचा सेफ्टी बेल्ट खुला झाला. त्यानंतर तो खाली कोसळला. स्थानिकांनी तातडीने त्याला आणि पायलटला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले.

हेही वाचा : 

राशी भविष्य – 26 DECEMBER 2022, सातत्याने सकारात्मक विचार…

Magh Chaturthi 2023 जाणून घ्या, नवीन वर्षात काेणत्या तारखेला असणार माघ चतुर्थी?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version