spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अदानी समूहाने दिले हिंडेनबर्गच्या अहवालाला प्रत्युत्तर, अहवाल खोटा असल्याचा केला दावा

हिंडेनबर्गने १०६ पानांचा अहवाल प्रकाशित केला होता, जो अदानी समुहाच्‍या विरोधात होता आणि त्यात अदानी समुहाने त्यांच्या शेअर्सशी छेडछाड केल्याचा दावा हिंडेनबर्गने केला होता.

गेल्या आठवड्यात हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाला झालेले नुकसान काही कुणापासून लपून राहिलेले नाही. या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स इंट्राडेमध्ये २०-२५ टक्क्यांनी घसरले. मात्र, हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी यांनी यावर ४१३ पानांचे सविस्तर उत्तर दिले. प्रत्युत्तरात अदानी म्हणाले की, हा भारतावर, त्याच्या संस्थांवर आणि त्याच्या वाढीवर जाणीवपूर्वक केलेला हल्ला आहे. हिंडेनबर्गने १०६ पानांचा अहवाल प्रकाशित केला होता, जो अदानी समुहाच्‍या विरोधात होता आणि त्यात अदानी समुहाने त्यांच्या शेअर्सशी छेडछाड केल्याचा दावा हिंडेनबर्गने केला होता. या अहवालानंतर अदानी समूहाने रविवारी ४१३ पानांचे उत्तर दिले. मात्र, या उत्तरावर हिंडेनबर्ग यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हिंडेनबर्गने पलटवार केला

अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्गने अदानी समूहाने दिलेल्या उत्तरावर प्रत्युत्तर दिले आणि सांगितले की त्यांच्या ४१३ पानांच्या उत्तरात अदानी समूहाने केवळ ३० पानांमध्ये या प्रकरणाशी संबंधित गोष्टी नमूद केल्या आहेत. याशिवाय हिंडेनबर्गने असेही म्हंटले आहे की, अदानी समूहाने आमच्या ८८ पैकी ६२ प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत. ताईच पुढे ते म्हणतात, अदानी समूहाने दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरांमध्ये त्यांनी एकतर आमच्या निष्कर्षांची पूर्तता केलेली नाही किंवा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, अदानी समूहाने केलेल्या भारताबाबतच्या विधानाचे आम्ही समर्थन करत नाही. ते पुढे म्हणाले की, भारत एक उत्तम लोकशाही आहे यावर आमचा विश्वास आहे. याशिवाय भारत उज्ज्वल भविष्यासह एक उदयास येणारी महासत्ता आहे. हिंडनबर्ग पुढे म्हणाले की, देशाची पद्धतशीर लूट करून स्वतःला राष्ट्रध्वजात गुंडाळणाऱ्या अदानी समूहामुळे भारताचे भवितव्य धोक्यात आहे, असा आमचा विश्वास आहे.

हिंडेनबर्गच्या अहवालावर अदानी समूहाने उत्तर

अदानी ग्रुपवर स्टॉक मॅनिप्युलेशनचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्गच्या अहवालावर, अदानी ग्रुपने म्हटले आहे की, हा कोणत्याही विशिष्ट कंपनीवर केलेला अन्यायकारक हल्ला नाही तर भारताचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि गुणवत्ता, भारताच्या संस्था आणि भारताची उद्दिष्टे आणि विकास यावर मुद्दाम करण्यात आलेला हल्ला आहे. रविवारी आपल्या उत्तरात अदानी समूहाने म्हटले की, हजारो मैल दूर बसलेल्या एखाद्या संस्थेच्या विधानांचा आमच्या गुंतवणूकदारांवर गंभीर आणि अभूतपूर्व विपरीत परिणाम झाला आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

अदानी यांनी असेही म्हंटले आहे की हिंडेनबर्गने हा अहवाल अशा वेळी प्रसिद्ध केला जेव्हा देशातील सर्वात मोठा एफपीओ येणार होता. अदानी समूहाने सांगितले की, हिंडेनबर्गचा अहवाल स्वतंत्र, वस्तुनिष्ठ किंवा संशोधन केलेला नाही. या अहवालावर अदानी समूहाने म्हंटले आहे की, हा अहवाल चुकीच्या हेतूने केलेल्या निराधार आणि बदनामीकारक आरोपांशी संबंधित आहे.

हे ही वाचा:

सत्यजित तांबेनी भाजपात प्रवेश करावा, राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान

Union Budget 2023-24 Live Updates, यंदाच्या बजेटची प्रत्येक लाईव्ह अपडेट घ्या जाणून…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss