या ठिकाणी बनते सर्वात मोठी चपाती; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आपल्या दैनंदिन आहारात चपातीचा समावेश आवर्जून केला जातो. भारतातील खाद्यपदार्थांमध्ये चपाती महत्वाची आहे. आपली भारतीय खाद्यसंस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे

या ठिकाणी बनते सर्वात मोठी चपाती; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

आपल्या दैनंदिन आहारात चपातीचा समावेश आवर्जून केला जातो. भारतातील खाद्यपदार्थांमध्ये चपाती महत्वाची आहे. आपली भारतीय खाद्यसंस्कृती ही जगभर प्रसिद्ध आहे. परदेशी लोकांनाही भारतीय खाद्यपदार्थ भरपूर आवडतात. अनेक देशांमध्ये भारतीय रेस्टोरंटला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. भारतीय लोक रोज त्यांच्या आहारात चपातीचा समावेश करतात. चपाती हा पदार्थ पौष्टीक असून त्याचे आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहित आहे का सर्वात मोठ्या आकाराची चपाती बनविण्याचा वल्ड रेकॉर्ड (World record) हा भारताच्या नावावर आहे. सर्वात मोठी चपाती ही आपल्या भारत देशात बनली जाते. या बनवलेल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या चपातीचे वजन साधारण १४५ किलो असे असून ही चपाती कोणत्याही खास दिवशी बनवली जाते. ही चपाती शेकडो लोक खाऊन त्यांचे पोट भरू शकतात. ही चपाती बनवताना अनेक लोक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. चला तर मग जाणून घेऊया ही चपाती भारतातील कोणत्या शहरात बनवली जाते.

जगातील सर्वात मोठी भारतातील गुजरात या राज्यात जामनगरमध्ये बनवली जाते. ही चपाती एका विशेष प्रसंगी बनवली जाते. जामनगर या जिल्यातील जलाराम बाप्पा आणि दगडू सेठ सार्वजनिक उत्सवाच्या जयंती प्रसंगी ही जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते. ही चपाती जलरं मंदिराच्या जीर्णोद्धार समितीकडून बनविण्यात येते. या समितीकडून बनविण्यात येणारी चपाती ही मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना दिली जाते. संपूर्ण देशातील भाविक ही चपाती कश्या प्रकारे बनविली जाते हे पाहण्यास गर्दी करतात.

जगातील सर्वात मोठी चपाती बनविण्यासाठी अनेक जण एकत्रित येतात. ही चपाती महिलांकडून बनवली जात असून या साठी अनेक महिलांची मदत घेतली जाते. हि चपाती बनविण्यासाठी एका खास तव्याची गरज भासते. या चपातीचे वजन सुमारे १४५ किलो असते. ही चपाती मंदिरात येणाऱ्या लाखो भाविकांना दिली जाते. ही चपाती बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते यासाठी गव्हाचेही पीठ भरपूर प्रमाणात लागते.

हे ही वाचा:

कागलमधील कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ झाले दंग

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version