PM Modiचे भाऊ प्रवास करत असलेल्या कारचा मोठा अपघात, अपघातात प्रल्हाद मोदी गंभीर जखमी

PM Modiचे  भाऊ प्रवास करत असलेल्या कारचा मोठा अपघात, अपघातात प्रल्हाद मोदी गंभीर जखमी

कर्नाटकातील म्हैसूरजवळ (Mysore) मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचे बंधू प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) यांच्या कारला अपघात झाल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोदी त्यांची पत्नी (wife), मुलगा (son), सून (daughter in law) आणि नातवासोबत मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कारमधून बांदीपुरा येथे जात असताना ती दुभाजकाला धडकली. म्हैसूरपासून १३ किमी अंतरावर कडकोलाजवळ ही घटना घडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबत फायनान्सिअल एक्सप्रेसने वृत्त प्रकाशित केले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रल्हाद मोदी यांच्यासोबत कारमध्ये मुलगा आणि सून प्रवास करत होते. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले असून, उपचारांसाठी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हैसूर जवळील कडकोल्ला परिसरात हा अपघात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

प्रल्हाद मोदी हे गुजरात फेअर प्राइस शॉप्स अँड केरोसीन लायसन्स होल्डर असोसिएशनचे प्रमुख आहेत. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका सामाजिक कार्यक्रमात गुजरातच्या जनतेने भाजपला निवडून दिले आहे. २०२४ मध्येही येथील सत्ता भारतीय जनता पक्षाकडेच राहील असा विश्वास मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींनी व्यक्त केला होता. प्रल्हाद मोदी यांच्या हनुवटीला दुखापत झाली, तर त्यांच्या सुनेच्या डोक्याला आणि नातवाच्या पायाला दुखापत झाली. चालकासह सर्व जखमींना म्हैसूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा यांनी घटनास्थळी भेट दिली असून म्हैसूर दक्षिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : 

सेल्फी घेताना कोलकात्यातील मुलीच्या ड्रेसला लागली आग, पोलिसांच्या त्वरीत कारवाईने वाचला जीव

कोरोनानंतर आता Brain-eating amoeba जगभरात केला कहर! दक्षिण कोरियामध्ये ‘ब्रेन-इटिंग अमीबा’शी संबंधित पहिल्या मृत्यूची नोंद

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version