spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केलं दुसरं लग्न

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान  आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही लग्नबंधनात अडकले.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान  आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे. दुपारी बाराच्या सुमारास दोघेही लग्नबंधनात अडकले.भगवंत मान यांचा हा दुसरा विवाह आहे.खाजगी पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात भगवंत मान यांच्याकडील २० आणि गुरप्रित यांच्याकडील २० लोक सहभागी झाले होते.  दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल कुटुंबासह या लग्नाला हजर होते. त्यांनी लग्नात वडिलांचे विधी पार पाडले. लग्नात मर्यादित पाहुणे बोलावण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 32 वर्षीय गुरप्रीत कौर या भगवंत मान (वय 48) यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली.

2015मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. डॉ. गुरप्रीत कौर यांचे कुटुंब सध्या पंजाबमध्ये राहत असले तरी तिचे वडिलोपार्जित निवासस्थान हरयाणातील कुरुक्षेत्र येथे आहे.भगवंत मान यांची आई हरपाल कौर यांची ‘आपल्या मुलाने पुन्हा लग्न करावे’, अशी ईच्छा होती.आईच्या ईच्छेचा मान ठेवत भगवंत मान यांनी आईने आणि बहिणीने निवडलेल्या मुलीशी म्हणजेच गुरप्रितशी लग्न केले आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.चंदीगढ येथील गुरूद्वारामध्ये आयोजित खासगी समारंभामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. नुकतेच त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटोज सोशल मीडियावर चर्चेत ठरले आहे.

माहितीनुसार, गुरप्रीत भगवंत मान यांच्या कॉमेडीच्या फॅन आहेत. भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या लग्नाचा मेनू व्हायरल होत आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हे लग्न अगदी गुपित ठेवले. भगवंत मान आणि गुरप्रीत यांच्या लग्नाच्या बातम्या लग्नाच्या 1 दिवस आधी समोर आल्या. या लग्नाला अत्यंत मोजक्या लोकांनाच आमंत्रित करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss