spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीची ठरली तारीख

विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या (INDIA) पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) होणारी ही बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पाटणा (Patna) आणि बंगळुरूनंतर (Bengaluru) विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे,

विरोधी पक्षांची आघाडी इंडियाच्या (INDIA) पुढील बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) होणारी ही बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. पाटणा (Patna) आणि बंगळुरूनंतर (Bengaluru) विरोधी आघाडीची ही तिसरी बैठक आहे, ज्यामध्ये संयोजकांव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी २६ पक्षांनी मिळून महाआघाडीची स्थापना केली आहे. पाटणा आणि बंगळुरू येथे झालेल्या दोन बैठकांनंतर विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार याची घोषणा आधीच करण्यात आली होती. आता या बैठकीची तयारी सुरू झाली आहे. या बैठकीची तारीख निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या ऑगस्ट महीन्याचा अखेरीस २६ पक्षांची मिळून बैठक घेतली जाणार आहे

विरोधकांच्या बंगळुरू येथील बैठकीत आघाडीला इंडिया नाव देण्यात आलं आहे. तसेच मुंबईच्या बैठकीत या आघाडीचा चेहरा आणि आघाडीची समन्वय समिती निश्चित होण्याचा अंदाज आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीहून मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईत आज संध्याकाळी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शरद पवार यांची भेट घेणार आहे.हि इंडियाची बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे. आगामी बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार आहे. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीत बैठकीचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच महाविकास आघाडीचं भवितव्य काय, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय विरोधी पक्षनेतेपदाची चर्चाही होऊ शकते. इंडियाची बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी ही बैठक होणार आहे.ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट यांच्याकडून संयुक्तरित्या या बैठकीचं आयोजन कऱण्यात येणार आहे. विरोधकांच्या आघाडीत आतापर्यंत २६ राजकीय पक्ष एकत्र आलं आहे.

या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यू)चे नेते नितीशकुमार उपस्थित होते. कुमार, द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते. RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काही इतर नेतेही या बैठकीला नेते उपस्थित होते.

हे ही वाचा:

रोहित पवार यांचं मोठं विधान…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली महत्वाची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss