कोलकाता पोलिसांच्या श्वान पथकाने केले पहिल्या पाळीव प्राणी अनुकूल दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन

पोस्टमध्ये देवतेसमोर नतमस्तक झालेल्या चार कुत्र्यांच्या छायाचित्रांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

कोलकाता पोलिसांच्या श्वान पथकाने केले पहिल्या पाळीव प्राणी अनुकूल दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन

बंगाली लोकांच्या सर्वात मोठ्या सणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गा पूजेसाठी माँ दुर्गेच्या आगमनासाठी कोलकाता सजले आहे. शहरातील विविध भागांमध्ये अनोख्या कलाप्रकारांचे प्रदर्शन करणारे अनेक पंडाल बांधण्यात आले आहेत. ज्यांना लोक आवर्जून भेट देत आहेत. तथापि, शहरातील अशाच एका विशिष्ट पूजा पंडालने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणि इतकेच नव्हे तर, पंडालच्या उद्घाटनावेळी कोलकाता पोलिसांच्या श्वान पथकातील चार विशेष सदस्य तेथे उपस्थित होते. कोलकाता पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये देवतेसमोर नतमस्तक झालेल्या चार कुत्र्यांच्या छायाचित्रांनी नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

“पंजा तारे! काल, आमच्या श्वान पथकातील ४ सदस्य – Labradors Molly & Camphor, German Shepherds Liza आणि Dinky यांनी कोलकात्याच्या पहिल्या पाळीव प्राणी-अनुकूल दुर्गापूजेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लावली, बिधान सरानी ऍटलस क्लब यांच्या सौजन्याने त्याची एक झलक शेअर करत आहोत,” अशा कॅप्शनसह कोलकाता पोलिसांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टला इंस्टाग्रामवर २k पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि ट्विटरवरही हे फोटो शेअर केले गेले आहेत. नेटकऱ्यांनी पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे आणि पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल दुर्गा पूजा पंडालची कल्पना आणल्याबद्दल क्लबचे कौतुक देखील केले आहे.

यावर्षी १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत दुर्गापूजा होणार आहे. १ ऑक्टोबर हा दुर्गापूजेचा पहिला दिवस आणि ५ ऑक्टोबर हा शेवटाचा दिवस आहे. दुर्गापूजेला दुर्गोत्सव असेही म्हटले जाते. दुर्गोत्सवाचा ५ दिवसांचा सण असून बंगालमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

हे ही वाचा:

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी ठाकरे – शिंदेची जय्यत तयारी सुरु

रिसॉर्टमध्ये ड्रग्ज, वेश्याव्यवसाय ही सामान्य गोष्ट होती: माजी कर्मचाऱ्यांचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version