डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार; वैद्यकीय शिक्षणात ७५ हजार जागा वाढणार

डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार साकार; वैद्यकीय शिक्षणात ७५ हजार जागा वाढणार

संपूर्ण देशभरात आज ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक नवनवे उपक्रम राबवत आहेत. अशाच प्रकारे  शिंदे सरकारकडून राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम राबवली जात आहे. त्याचबरोबर पंपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या स्वातंत्र्य दिनी अकराव्यांदा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांशी संवाद साधत त्यांना संबोधित केलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण त्यांनी केले. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तसेच मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

पंतप्रधानांच्या महत्वपूर्ण घोषणा :

डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातील मुलांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं. त्यासाठी त्यांना कुठल्याही देशांमध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. मात्र त्यासाठी त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. आम्ही मागच्या १० वर्षात मेडीकल सीट वाढवून १  लाख केल्या आहेत. त्यामुळे आता येत्या ५ वर्षांत ७५,००० जागा वाढवण्यात येतील, असं सरकारनं निश्चित केल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.पंतप्रधान म्हणाले, “वैद्यकीय शिक्षणासाठी आमची मुलं देशाबाहेर जात आहेत. यामध्ये जास्त करुन मध्यवर्गीय कुटुंबातील मुलं आहेत, यासाठी त्यांचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. दरवर्षी २५ हजार विद्यार्थी मेडीकल शिक्षणासाठी परदेशात जातात. त्यामुळं गेल्या १० वर्षात आम्ही मेडिकलच्या जागा वाढवून त्या १  लाख केल्या. त्यामुळं आम्ही हे निश्चित केलं आहे की येत्या पाच वर्षात मेडिकल क्षेत्रात ७५ हजार नव्या जागा तयार केल्या जातील” असं त्यांनी नमूद केलं.

मोदी नक्की काय म्हणाले ?

 ते पुढे म्हणाले.. भारताचा हा सुवर्णकाळ आहे. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाही. आपण याच संधीचा फायदा घेऊन स्वप्न आणि संकल्पाना घेऊन पुढे गेलो तर २०४७ पर्यंत भारताला विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे ते म्हणाले. दरम्यान मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ‘पुढच्या पाच वर्षात मेडीकल क्षेत्रात ७५ हजार नवीन जागा निर्माण करणार आहोत. २०४७ साली विकसित भारत स्वस्थ भारत असला पाहिजे’ असं पीएम मोदी म्हणाले. त्याच

सरकारला पत्र लिहून तुमच्या अडचणी सांगा, पंतप्रधानांचे आवाहन :

आपण मिशन मोडवर इज ऑफ लिंव्हिंगसाठी काम केलं पाहिजे, असं मी लोकप्रतिनिधींना आवाहन करतो . युवक, प्राध्यापकांना आवाहन करतो की तुम्हाला भेडसावणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा. या अडचणींवर असलेल्या उपायांबद्दल सांगा. कोणतेही कारण नसताना उभ्या राहिलेल्या या अडचणींविषयी सरकारला पत्राद्वारे सांगा. देशातील प्रत्येक सरकार संवेदनशील आहे. देशातील स्थानिक स्वराज्य संस्था असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार तुम्ही लिहिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल, याचा मला विश्वास आहे.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट ते २० ऑगस्ट या दिवसांची सुट्टी आता होणार आनंददायी; Central Railway चालवणार १८ विशेष रेल्वे गाड्या!

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version