‘मंगळसूत्रावर’ मद्रास हायकोर्टानं केलं अजब मत व्यक्त

पतीपासून वेगळं राहत असलेल्या पत्नीनं मंगळसूत्र काढून टाकणं, ही गोष्ट पतीचा मानसिक छळ करणारी असून शकते, असे मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

‘मंगळसूत्रावर’ मद्रास हायकोर्टानं केलं अजब मत व्यक्त

पतीपासून वेगळं राहत असलेल्या पत्नीनं मंगळसूत्र काढून टाकणं, ही गोष्ट पतीचा मानसिक छळ करणारी असून शकते, असे मत मद्रास उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. याच मुद्द्याच्या आधारावर मद्रास उच्च न्यायालयानं पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला आहे. पत्नीने मंगळसूत्र न घालणे हा इतकाच मुद्दा या घटस्फोटाला कारणीभूत नाहीये तर इतर पुराव्याच्या आधारे देखील हा निर्णय घेण्यात आला आहे असे स्पष्ट करत, न्यायमूर्ती व्ही एम वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी केली.

नेमकं प्रकरण काय आहे?

तामिळनाडूमधील इरोड येथील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या सी. शिवकुमार यांनी 15 जून 2016 साली स्थानिक कुटुंब न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या कुटुंब न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटास नकार दिला होता. तसेच, पत्नीनेदेखील घटस्फोट देण्यास नकार दिला होता त्यामुळे याप्रकरणी महिलेची चौकशी केली. त्यादरम्यान, विभक्त होण्याच्या वेळी तिने तिच्या लग्नाचे प्रतीक म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली आहे. असं तिने कबूल केले.

गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची आवश्यक नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही.असं महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा पुरावा देत सांगितले. पण, पत्नीने यापूर्वी आपल्या पतीचे त्याच्या महिला सहकाऱ्यांशी विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोपही केले होते. विद्यार्थी, सहकारी आणि पोलिसांसमोर तिने असे आरोप केले होते. हादेखील पतीसाठी मानसिक धक्का होता. दुसऱ्या व्यक्तींसमोर पतीवर असे बिनबुडाचे आरोप करणंदेखील क्रूरता असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

हेही वाचा : 

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ढकलले पुढे

Exit mobile version